एखादा पुरुष जेव्हा महिलेला स्पर्श करतो किंवा तिच्याकडे बघतो त्यावेळीच त्याचा हेतू नक्की काय आहे, हे महिलेला समजतं. स्त्रियांना निसर्गाने दिलेली ही देणगीच आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायामूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी नोंदवले आहे.
उद्योगपती विकास सचदेव यांनी २0१७मध्ये एका अभिनेत्रीचा विनयभंग केला होता. याप्रकरणी सत्र न्यायालयाने त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्याला सचदेव यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवरील सुनावणीवेळी कोर्टाने हे निरीक्षण नोंदवले आहे. स्त्रियांना कदाचित याची कमी माहिती असेल, पण एखाद्या पुरुषाने केलेला स्पर्श किंवा त्याचा तिच्याकडे पाहण्याचा हेतू महिलेला समजलेला असतो. निसर्गाने त्यांना दिलेलं हे वरदानच आहे, असे न्यायमूर्ती चव्हाण यांनी सांगितले. महिलेला चुकीच्या हेतूने स्पर्श केला हे आरोपी कधीच मान्य करणार नाही. असे ही कोर्टाने म्हटले. सचदेव यांनी विमानात पुरेशी जागा असताना त्यांनी दुसऱ्या सीटवर त्याचे पाय आणि हात का ठेवले ?असा सवाल ही कोर्टाने केला आहे.
बाॅलीवूडमधील एका नवनिर्वाचित अभिनेत्री नवी दिल्ली ते मुंबई असा विमान प्रवास करताना. मुंबईतील एका उद्योगपतीने तिचा विनयभंग केला होता, तिनेच ही माहिती सोशल मीडियावरद्वारे प्रसिद्ध केली होती. कोर्टाने या उद्योगपतीला विनयभंगाच्या गुन्ह्यात दोषी ठरविले. सचदेव यांच्या या कृत्याचा व्हिडिओ काढून अभिनेत्रीने सोशल मिडियावर प्रसिद्ध केल्यामुळे या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होती. या प्रसंगानंतर एका १८ वर्षीय मुलीने धार्मिक कारणासाठी बॉलिवुडमधील करियर सोडण्याचा निर्णय घेतला, असा उल्लेख तिने केला होता.