रिझवी कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर


SHARES

वांद्रे - नववर्षाच्या सुरुवातीला तुर्किमधल्या इस्तांबुल शहरात दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात राज्यसभा खासदार अख्तर हसन रिझवी यांचा मुलगा अबिस रिझवी यांचा मृत्यू झाला. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रिझवी कुटुंबियांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. तसंच अभिनेत्री रवीना टंडन, अभिनेता जावेद जाफरी, नावेद जाफरी, दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनीही रिझवी कुटुंबियांची भेट घेतली.

अबिस रिझवी यांचा मृतदेह मंगळवारी भारतात आणला जाण्याची शक्यता आहे. बुधवारी अबिसवर अंत्यसंस्कार केले जातील. 31 डिसेंबर 2016 ला नववर्षाचं उत्साहात स्वागत सुरू होतं. सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळत होतं. पण नववर्षाच्या सुरुवातीला मुंबईतल्या एका कुटुंबावर मात्र दु:खांचा डोंगर कोसळला. 31 डिसेंबरची रात्र रिझवी कुटुंबासाठी काळी ठरली होती. कारण शनिवारी रात्री तुर्कीमधल्या इस्तांबुल शहरात दहशतवादी हल्ला झाला. नववर्षाचं सेलिब्रेशन सुरू असताना सान्ताक्लॉजच्या वेशात आलेल्या एकानं अंधाधुंद गोळीबार केला. यात 39 जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन भारतीयांचाही समावेश होता.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा