पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला आरोपी जेरबंद


पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला आरोपी जेरबंद
SHARES

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या ३५ वर्षीय आरोपीला पुन्हा जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलं आहे. योगेश दर्जी असं या आरोपीचं नाव आहे. न्यायालयात तारखेनुसार हजर करत असताना त्याने पोलिसांच्या हाताला तुरी देत पळ काढला होता. आता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दर्जीचा ताबा आझाद मैदान पोलिसांना दिला आहे.


सप्टेंबरमध्ये झाली होती अटक

योगेश कन्नुभाई दर्जी याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. ३ नोव्हेंबरला त्याला न्यायालयापुढे हजर करण्यासाठी आणण्यात आलं होतं. त्यावेळी त्याने पलायन केलं होतं.


आरोपी पोलिसांच्या ताब्यात

याप्रकरणी भादंवि कलम २२४ अंतर्गत आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी योगेश अंधेरी डी. एन. नगर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीधनकर, अतिरिक्त निरीक्षक पाटणकर, पोलिस नाईक निखाळे आणि पालांडे यांच्या पथकाला मिळाल्यानंतर त्याला अखेर ताब्यात घेतलं. पुढील तपासासाठी त्याला आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा