कारच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

  Bandra Reclamation
  कारच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
  मुंबई  -  

  मुंबईच्या वांद्रे परिसरात गुरुवारी कारचा भीषण अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत. या घटनेनंतर कारचालक आणि गाडीतील एक महिला अजूनही फरार आहेत. सध्या पोलिस त्यांच्या मागावर आहेत.

  गुरुवारी दुपारी वांद्रे रेक्लमेशनच्या पुलावरून एक काळ्या रंगाची शेवोर्ले क्रूज गाडी जात होती. असे सांगितले जाते, या पुलावरच चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी सरळ होर्डिंगचे काम करत असलेल्या कामगारांना जाऊन धडकली. त्यानंतर ती कार चक्क पुलावरून खाली पडली. यावेळी कामगारांमधील एक कामगार देखील पुलावरून खाली पडला. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एका कामगाराचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
  या दुर्घटनेत लाला बन्सी 28 आणि संदीप गौडा 26 या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर मोहम्मद शकील हा 26 वर्षांचा कामगार जखमी झाला आहे. या अपघाताबद्दल वांद्रे पोलिस ठाण्यात कार चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  या दुर्घटनेत कार पुलावरून खाली पडली. मात्र एवढे झाल्यानंतरही गाडीचा चालक आणि त्याच्या सोबत गाडीत बसलेली महिला फरार झाल्याने पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केले.


  हेही वाचा -

  अपघात बघायला रस्त्यावर थांबू नका; तुमचाही अपघात होईल!

  मुंबईत पुन्हा हिट अॅण्ड रन, एकाला अटक


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.