• अपघात करणारी 'ती' महिला फरार
SHARE

अंधेरीजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास रेंज रोवर आणि स्विफ्ट डिझायरच्या ओला कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात ओलाचा ड्रायव्हर राज कुमार पटेल हा गंभीर जखमी झाला होता. जखमी ड्रायव्हरला अधिक उपचारासाठी कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या घटनेनंतर रेंजरोवरची चालक फरार झाली असून, मुंबई पोलीस तिचा शोध घेत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेंजरोवर एक महिला चालवत होती. या महिलेसोबत त्यावेळी अजून दोघे पुरुष होते. मात्र अपघातानंतर ते तिघेही रिक्षामध्ये बसून पसार झाले. विशेष म्हणजे ही महिला 19 मे रोजी परदेशात जाणार आहे. तसा तिचा पासपोर्टच पोलिसांच्या हाती लागला आहे. मात्र याबाबत पोलिसांनी बोलण्यास नकार दिला आहे.

असा झाला अपघात -

ड्रायव्हर पटेल याने दिलेल्या माहितीनुसार ते पहाटे तीनच्या सुमारास वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेने विलेपार्लेवरून बोरीवलीच्या दिशेने जात होते. त्याचवेळी अंधेरी स्टेशनच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या रेंज रोवर गाडीने त्यांच्या स्विफ्ट डिझायर गाडीला धडक दिली. रेंज रोवर गाडीचा वेग इतका होता की या धडकेत स्विफ्ट डिझायरने तीनवेळा पलटी मारली. यामध्ये कारचालक पटेल जखमी झाले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या