दादर टीटी परिसरात बस अपघात; 35 जखमी, एकाचा मृत्यू

Dadar (w)
दादर टीटी परिसरात बस अपघात; 35 जखमी, एकाचा मृत्यू
दादर टीटी परिसरात बस अपघात; 35 जखमी, एकाचा मृत्यू
See all
मुंबई  -  

देवरुख रत्नागिरी ते बोरीवली व्हाया दादरच्या रिया ट्रॅव्हल्स कंपनीच्या बस क्रमांक (एमएच- 04, एफके -7776) ला रविवारी पहाटे 4.30 ते 5 च्या सुमारास अपघात झाला. दादर टीटी परिसरात पहाटे हा भीषण आणि विचित्र अपघात झाला. रत्नागिरीहून बोरीवलीकडे जात असताना रस्त्यावरील दुभाजकावर धडक बसल्याने या बसला अपघात झाला. या घटनेत 35 प्रवासी जखमी झाले तर 1 प्रवासी साईनाथ भालेकर (35) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमींना सायन आणि केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मुथ्थू नाडर या वाहन चालकास माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर 279, 337, 338, 304 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.