शिवडीत कंटेनरची सुमो कारला धडक

 Gadi Adda
शिवडीत कंटेनरची सुमो कारला धडक

शिवडी - ट्रक कंटेनरने सुमो कारला धडक दिल्याने शिवडी (पू.) येथील गाडी अड्डा परिसरात मंगळवारी अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सुमो कारचे नुकसान झाले आहे. सदर घटनेची नोंद शिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून कोणाविरोधातही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे शिवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुधीर नावगे यांनी सांगितले.

सुमो कार रे रोडवरून वडाळ्याच्या दिशेला येत असताना शिवडी गाडी अड्डा येथे कंटेनरच्या क्लिनरने सुमोला पुढे जाण्याचा इशारा दिला. त्यामुळे सुमो कारचा वाहनचालक विकास भोसलेने कार कंटेनरच्या पुढे नेली आणि तितक्यात कंटेनरचा वाहन चालक कोणताही सिग्नल न देता पुढे आला त्यामुळे हा अपघात झाला. 

टाटा सुमो कारमध्ये सहा प्रवासी होते. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. कंटेनर चालकाने सुमोचे झालेले नुकसान भरपाई देण्याचे कबुल केल्याने तसेच सुमो चालकास कोणतीही तक्रार नोंदवायची नसल्याने या घटनेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.

Loading Comments