अपघातात सहा जण ठार, तीन जखमी

वाडीबंदर - वेळ : शनिवारी सकाळी 9 वाजता, स्थळ : वाडीबंदर. एकच आवाज झाला आणि होत्याचं नव्हतं झालं. शनिवारी फ्री-वे वरून येणाऱ्या टॅक्सीचा भीषण अपघात झाला. टॅक्सीचा अशरक्षा चेंदामेंदा झाला आणि टॅक्सीत बसलेल्या एकाच कुटुंबातल्या सहा जणांचा मृत्यू झाला. तर टॅक्सीचालकासह तिघे जखमी झाले. या टॅक्सीचालकाविरोधात मनुष्य वधनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण मागून आलेल्या बसनं त्याला टक्कर दिली आणि अपघात झाला असं टॅक्सीचालकानं सांगितलं. 

या घटनेनंतर सगळ्यांनाच पडलेला प्रश्न होता, तो म्हणजे सँट्रोसारख्या छोट्याशा टॅक्सीमध्ये नऊ जण बसलेच कसे? वाहतुकीच्या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष केलं जातं. हे किती धोकादायक ठरू शकतं हे या अपघातातून पुन्हा सिद्ध झालंय. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा, असं मुंबई लाइव्हकडून विनम्र आवाहन. 

Loading Comments