वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात

 Andheri
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात

अंधेरी - वेर्स्टन एक्स्प्रेस हायवे येथील मेट्रो स्टेशनजवळ कुरीयर कंपनीच्या गाडीला मंगळवारी रात्री कारने धडक दिली. या अपघातात कार चालक किरकोळ जखमी झाला आहे. पण गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. 

वेगाच असलेली ही कार अंधेरीच्या दिशेने जात होती. कार जेव्हा सिग्नलजवळ आली तेव्हा कारने समोरून येणाऱ्या कुरिअरच्या गाडीला धडक दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गाड्यांना बाजूला काढले. कार चालक नशेत तर नव्हता ना याचा तपास देखील पोलीस करत आहेत.

Loading Comments