लाॅकडाऊनमुळे रस्ते अपघातात २६ टक्क्यांनी घट


लाॅकडाऊनमुळे रस्ते अपघातात २६ टक्क्यांनी घट
SHARES

२०२० हे वर्ष कोरोनामुळे सर्वांसाठी त्रास दायक गेले असले. तरी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर २०२० मध्ये पुकारण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे राज्यात रस्ते अपघाताच्या प्रमाणात कमालीची घट पहायला मिळाली. मात्र अपघाताची संख्या कमी असली. तरी मृत्यूची संख्या काही कमी झालेली नाही. लाॅकडाऊनच्या ९ महिन्यात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याही तब्बल १० हजाराच्या आसपास आहे. यातील बहुंताश मृतांमध्ये सायकल, मोटारसायकल आणि पादचऱ्यांचा समावेश आहे.

 हेही वाचाः- रोज  १२ हजार मुंबईकरांना मिळणार कोरोना लस

लाॅकडाऊनच्या ९ महिन्यात महाराष्ट्रात अत्यावश सेवा वगळता. इतर नागरिकांना वाहतूकीसाठी बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे रस्त्यावर फारशी वाहनांची वरदळ नव्हती.  त्यामुळे राज्यातील अपघातांच्या संख्येत कमालीची घट झाली खरी, मात्र अपघातात मृत पडणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली नाही. या ९ महिन्यात नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, बीड, जालना या जिल्ह्यात सर्वाधिक अपघात झाल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यातली ४४ पोलिस विभागांपैकी २८ विभागांनी अपघाताच्या प्रमाणात २० टक्के घट करण्याचे लक्ष न गाठल्याचे समोर आले आहे. यामध्ये २४ जिल्ह्यांचा समावेश आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२० मध्ये ४४ विभागात एकूण २२ हजार १९६ अपघातांची नोंद करण्यात आली आहे. त्या अपघातात एकूण ९ हजार ९२० जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर १७ हजार ६८३ जणं गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जाते.  मागील वर्षी जानेवारी-डिसेंबर २०१९ मध्ये ३० हजार ५ अपघात झाले असून त्यात ११ हजार ६३४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २६ हजार २३५ जणं गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जाते.  

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा