खोट्या बंदुकीने दरोडा टाकणाऱ्या सराईत आरोपींना अटक


खोट्या बंदुकीने दरोडा टाकणाऱ्या सराईत आरोपींना अटक
SHARES

मुंबईच्या कुर्ला परिसरात चार आरोपींनी चक्क खोट्या रिव्हाँल्वरच्या मदतीने एका व्यावसायिकाच्या घरात दरोडा टाकल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी कुर्लाच्या नेहरूनगर पोलिस ठाण्यात तीन आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी हा गुन्हा गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये ३ पुरूषांसह एका महिलेचाही समावेश आहे. 

कुर्ला स्टेशनजवळील धम्म सेवा को. आँ. हौ. सोसायटीमधील एका व्यापाऱ्याच्या घरात आरोपी मोहम्मद सोहेल अन्सारी (२२), रफिक अली कुतुब अली (३०), नासीर अली अलीम उद्दीन (२५) आणि त्याचे दोन सहकारी घरात शिरले. त्यावेळी आरोपींकडे चाकू, कोयते आणि एक खोटी रिव्हाँल्वर होती. या शस्त्रांची भिती घालून आरोपींनी व्यापाऱ्याच्या घरात दरोडा टाकला.  तसेच रस्त्यात आडवे येणाऱ्या व्यापाऱ्याच्या घरातल्यांना शस्त्रांचा धाक दाखवून आरोपींनी पळ काढला. या प्रकरणी चुनाभट्टी पोलीसांनी कलम ३९९,४०२,३४ भा.द.वी कलमांसह ४,२५ भारतीय हत्यार कायदासह ३७(१)(अ) सह १३५ मपोका कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून हा गुन्हा गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींना अटक केली. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा