डॉक्टर तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकणारा अटकेत

डाॅक्टर असलेल्या तरुणीला लग्नाचं आमीष दाखवून तिच्याशी शरीर संबध ठेवत, कालांतराने लग्नाला नकार देऊन तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकणाऱ्या विकृताला टिळक नगर पोलिसांनी अटक केली आहे. इम्रान साबिरअली शहा (३०) असं या आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी न्यायालयाने त्याला २२ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

डॉक्टर तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकणारा अटकेत
SHARES

कुर्ला येथील एका रुग्णालयातील डाॅक्टर असलेल्या तरुणीला लग्नाचं आमीष दाखवून तिच्याशी शरीर संबध ठेवत, कालांतराने लग्नाला नकार देऊन तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकणाऱ्या विकृताला टिळक नगर पोलिसांनी अटक केली आहे. इम्रान साबिरअली शहा (३०) असं या आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी न्यायालयाने त्याला २२ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


संपूर्ण प्रकार

मुंबईच्या विद्याविहार परिसरात राहणारी पीडित २८ वर्षीय तरुणी ही कुर्ला येथील एका नामांकित रुग्णालयात डाॅक्टर आहे. २००९ ते २०१४ मध्ये ती तिचे वैद्यकिय शिक्षण पूर्ण करण्यासाठी इंदौरला गेली होती. त्यावेळी सुट्टीच्या काळात अधूनमधून सांताक्रूझ येथे राहणाऱ्या तिच्या मावशीच्या घरी यायची. त्यावेळी मावशीचा मुलगा आरोपी इम्रान शहा सोबत तिची ओळख झाली होती.

त्यावेळी दोघांमधील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यावेळी सुट्टीच्या काळात ज्याज्या वेळी पीडित तरुणी मुंबईला यायची त्यावेळी आरोपी इम्रान तिला लग्नाचं आश्वासन देऊन तिच्यासोबत शारीरिक संबध ठेवायचा. पीडितेच्या नकळत त्याने तिचे अश्लील फोटोही काढून ठेवले होते. त्यानंतर इम्रानने पीडित तरुणीचं फेसबुक, हाईक, इंन्स्टाग्राम अकाऊंटही हॅक करून त्यावरून तरुणीच्या मैत्रिणींशी बोलायचा. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीने तिचे सर्व अकाऊंट बंद केलं.


अखेर पोलिसांत केली तक्रार

कालांतराने इम्रान तरुणीला टाळू लागला. त्याने तरुणीच्या पश्च्यात २०१७ मध्ये दुसऱ्याच मुलीशी लग्नही केलं. इम्रान हा मावशीचाच मुलगा असल्यामुळे तरुणी पोलिसांत गेली नाही. कालांतराने तिचंही लग्न ठरेल. याबाबतची माहिती इम्रानला कळाल्यानंतर त्याने तरुणीला फोन करून त्रास देण्यास सुरुवात केली.

ऐवढ्यावरच न थांबता इम्रानने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून तिच्यासोबत काम करणाऱ्या मैत्रिणींनाही ते अश्लील फोटो पाठवले. हा सर्व प्रकार तरूणीला माहीत पडल्यानंतर तिने टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार टिळकनगर पोलिसांनी इम्रानला अटक करत न्यायालयात हजर केले असता त्याला २२ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा