‘फिल्मी स्टाईल’ने आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला


‘फिल्मी स्टाईल’ने आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला
SHARES

चित्रपटात ज्या प्रमाणे एक आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळ काढतो. तशीच काहीशी घटना मुंबईच्या चुन्नाभट्टी पोलिसांच्या सोबत झाली आहे. हा आरोपी सराई गुन्हेगार असून त्याच्यावर मुंबईतल्या विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या फरार आरोपीवर चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून सध्या या आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत.

हेही वाचाः- ‘यांना’ मिळणार नाही कोरोनावरील लस, राजेश टोपेंची माहिती

चोरी, घरफोडी सारख्या गंभीर गुन्ह्यांची संख्या मुंबईत दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच पेट्रोलिंग दरम्यान चुन्नाभट्टी पोलिसांनी एका गुन्ह्यात रविचंद्रन मनिअप्पन श्रीजीवी (२०) याला अटक केली होती. आरोपी रविचंद्रन हा मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर झोपडपट्टीत राहतो.  या आरोपीला चुन्नाभटी पोलिस नियमानुसार बुधवारी ११ च्या सुमारास न्यायालयात रिमांडसाठी  नेत होती. त्यावेळी पोलिसांच्या नकळत हातातील बेडी काढण्यासाठी रविचंद्रन याचे प्रयत्न सुरू होते.  पोलिसांच्या गाडीचा रिलायन्स फ्रेश माँलसमोर, स्वदेशी मील रोड येथे वाहतूक कोंडी वेग कमी झाला. तर दुसरीकडे रविचंद्रनने पोलिसांच्या नकळत हातातील बेडी उघडली.

हेही वाचाः- नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी अटक

संधी साधून रविचंद्रनने गाडीतील पोलिसांना मारहाण करून धावत्या गाडीतून उडी टाकून पळ काढला. पोलिस त्याला पकडण्यासाठी मागे धावले. मात्र तो पोलिसांच्या हाताला लागला नाही. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी रविचंद्रनवर ३५३, २२४,३३२ भा.द.वि कलमांतर्गत गुन्हा नोंदवूला आहे. चुनाभट्टी पोलिस रविचंद्रनचा शोध घेत आहेत. आरोपी रविचंद्रनवर यापूर्वी चुनाभट्टी, डोंगरी पोलिस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. 

संबंधित विषय