Advertisement

‘यांना’ मिळणार नाही कोरोनावरील लस, राजेश टोपेंची माहिती

केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार राज्यामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्यानुसार काही ठराविक व्यक्तींना लस देण्यात येणार नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

‘यांना’ मिळणार नाही कोरोनावरील लस, राजेश टोपेंची माहिती
SHARES

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १६ जानेवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपूर्ण देशभरात लसीकरणाचं उद्घाटन होईल. त्यानंतर महाराष्ट्रातही लसीकरणाला सुरूवात होईल. केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार राज्यामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्यानुसार काही ठराविक व्यक्तींना लस देण्यात येणार नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राजेश टोपे यांनी सांगितलं की, लसीकरण माेहिमेअंतर्गत ८ लाख लोकांची नोंदणी कोविन अॅपवर करण्यात आलेली आहे. त्यानुसार बफर स्टॉकसहित आपल्याला १७ ते साडे सतरा डोसची गरज आहे. परंतु केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ९ लाख ७३ हजार लसीचे डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आवश्यकतेच्या केवळ ५५ टक्के म्हणजेच निम्मे डोस उपलब्ध झाले आहेत. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार लसीकरण करणाऱ्या व्यक्तीला २ डोस दिले जाणार आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यानं एक डोस दिल्यानंतर ४ ते ६ आठवड्याच्या अंतराने दुसरा डोस दिला जाणार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

हेही वाचा- महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस, राजेश टोपेंचा केंद्रावर गंभीर आरोप 

कोरोना लसीकरण कार्यक्रमांतर्गत १८ वर्षांखालील व्यक्ती, गरोदर महिला, तसंच कोणत्याही प्रकारची अॅलर्जी असलेल्या व्यक्तींना कोरोनावरील (coronavirus) लस देण्यात येणार नाही. त्याचसोबत लसीकरणाच्या या कार्यक्रमात कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांना देखील तूर्तास लस देण्यात येणार नाही. कारण आरोग्य कर्मचाऱ्यांनाच लस देण्याचं केंद्रानं बंधनकारक केलं आहे. 

केंद्राकडून देण्यात आलेली कोरोना लस आज रात्रीपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत महाराष्ट्रातील (maharashtra) सर्व विभागीय कार्यालयांमध्ये, जिल्ह्यांमध्ये पोहोचेल, मोठ्या स्तरावर लसीकरण करु नका, असं केंद्राने सांगितल्याने लसीकरण केंद्रांची संख्या ५११ वरुन ३५० इतकी कमी करण्यात आली आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर १०० अशा पद्धतीने पहिल्या दिवशी ३५ हजार जणांना लस देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

(under 18 years citizens will not get corona vaccine dose says maharashtra health minister rajesh tope)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय