Advertisement

महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस, राजेश टोपेंचा केंद्रावर गंभीर आरोप

राज्यात कोरोना लसीकरणाच्या तयारीने वेग घेतलेला असतानाचा महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून अपेक्षेपेक्षा लसीचे कमी डोस मिळाल्याचा गंभीर आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.

महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस, राजेश टोपेंचा केंद्रावर गंभीर आरोप
SHARES

राज्यात कोरोना लसीकरणाच्या तयारीने वेग घेतलेला असतानाचा महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून अपेक्षेपेक्षा लसीचे कमी डोस मिळाल्याचा गंभीर आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी केला आहे. त्यामुळे केंद्राकडून करण्यात आलेल्या सूचनेनंतर लसीकरण केंद्रांची संख्या कमी करण्यात आल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली.

कोरोना लसीच्या डोसबद्दल एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना राजेश टोपे यांनी सांगितलं की, महाराष्ट्राला (maharashtra) बफर स्टॉकसहित एकूण १७ ते साडे सतरा लाख कोरोना लसींच्या डोसची गरज आहे. असं असूनही केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला पहिल्या टप्प्यात ९ लाख ७३ हजार लसीचे डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. म्हणजेच आवश्यकतेच्या केवळ ५५ टक्के म्हणजेच निम्मे डोस आले आहेत. केंद्र सरकाराच्या सूचनेनुसार प्रत्येक व्यक्तिला पूर्ण डोस देण्यात येणार आहे. परिणामी सध्याची कोरोना लसीची उपलब्धता पाहता ८ लाख लोकांचं लसीकरण करायचं असतानाही आम्हाला ५ लाखांपर्यंत लसीकरण करता येईल. 

राज्य सरकारने कोरोना लसीकरणासाठी (coronavirus vaccine) ५११ केंद्रांचं नियोजन केलं होतं. परंतु केंद्राच्या सूचनेनंतर ही संख्या कमी करून ३५० वर नेण्यात आली आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर १०० अशा पद्धतीने पहिल्या दिवशी ३५ हजार जणांना लस देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. 

हेही वाचा- राज्यात ५११ ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र

केंद्र सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आलेली लस आज रात्रीपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत सर्व विभागीय कार्यालयांमध्ये पोहोचेल. सोबत अनेक जिल्ह्यांमध्ये उद्यापर्यंत लसीचे डोस हमखास पोहोचतील. १६ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपूर्ण देशभरात लसीकरणाचं उद्घाटन करतील. त्यानंतर महाराष्ट्रातही लसीकरणाला सुरूवात होईल. मुंबईतील कूपर रुग्णालय आणि जालन्यातील जिल्हा रुग्णालयातून पंतप्रधानांशी संवाद साधला जाणार आहे, अशी माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली. 

लसीकरणासाठी प्राधान्य क्रमाने गट ठरवण्यात आले असून पहिल्या गटात आरोग्य सेवा देणारे कर्मचारी (हेल्थ केअर वर्कर्स) यामध्ये शासकीय व खाजगी आरोग्य संस्थामधील सर्व कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका आदींचा समावेश आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचा लसीकरणासाठी ९ गटात वर्गीकरण करण्यात आलं आहे.

फ्रंट लाईन वर्कर्समध्ये राज्य व केंद्रीय पोलीस दल, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, म्युनिसिपल वर्कर्स इ.चा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या गटात ५० वर्षांवरील सर्व व्यक्ती व ज्यांना अन्य आजार व्याधी आहेत अशा ५० वर्षाखालील व्यक्तींचा समावेश आहे.

राज्यात शितगृहाची उपलब्धता असून राज्यस्तरीय एक, विभागीय स्तरावर ९, जिल्हास्तरावर ३४, महानगरपालिकास्तरावर २७, असे शितगृह तयार असून ३ हजार १३५ शितसाखळी केंद्र उपलब्ध आहेत. वॉक इन कूलर - २१, वॉक इन फ्रिजर -४, आय एल.आर. ४१५३, डिप फ्रीजर- ३९३७ आहेत.

(central government provides short doses of corona vaccine to maharashtra blames health minister rajesh tope)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा