बनावट पॅनकार्डला आमदार, नगरसेविकेच्या लेटरहेडचा अाधार

पोलिस तपासात बँकेत खाते उघडण्यासाठी बनावट पॅनकार्डचा वापर करण्यात आल्याचं लक्षात आल्यानंतर निवासी दाखल्याची चौकशी करण्यात आली. त्यात पोलिसांनी हस्तगत केलेल्या ८१ पॅनकार्डसाठी नेते मंडळीच्या लेटरहेडचा वापर करण्यात आला होता. हे लेटरहेड काँग्रेसचे आमदार आमीन पटेल, भाजपाचे माजी नगरसेवक महंत चौबे, आणि काँग्रेस नगरसेविका सुप्रिया सुनिल मोरे यांचं असल्याचं चौकशीत पुढे आलं आहे.

बनावट पॅनकार्डला आमदार, नगरसेविकेच्या लेटरहेडचा अाधार
SHARES

बनावट पॅनकार्ड बनवून गैरव्यवहार करणाऱ्या टोळीचा काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखा २ च्या पोलिसांनी पर्दाफाश केला. या खळबळजनक प्रकारातून आरोपींनी सर्वसामान्य नागरिकांसह सरकारची बिनबोभाट आर्थिक फसवणूक केली खरी, मात्र ही फसवणूक करण्यासाठी या आरोपींनी शहरातील काँग्रेस आमदार आणि नगरसेवकाच्या लेटरहेडचा वापर केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी दक्षिण मुंबईतील काँग्रेस आमदार आणि २ नगरसेवकांची चौकशी गुन्हे शाखा २ चे पोलिस करणार आहेत.


काय आहे प्रकरण?

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा २ च्या पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बनावट पॅनकार्ड आणि आधारकार्ड बनवणाऱ्या सुधीर चौधरीला पायधुनी परिसरातून अटक केली होती. पोलिसांनी अधिक चौकशीसाठी त्याच्या भायखळा येथील घराची झडती घेतली. त्यावेळी पोलिसांना सुधीरच्या घरात कस्टम व्यवहारांसाठी लागणारे बँकेच्या सर्विस टँक्सची कागदपत्रे मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संबधित खात्यांवर सुरू असलेल्या व्यवहारांचा तपशील जमा केला. त्यावेळी १० जणांच्या खात्यातून हे व्यवहार सुरू असल्याचं आढळून आलं.


बँकेत दुसरीच माहिती

त्यानुसार पोलिसांनी संबधित खाते ज्या कुणाच्या नावावर आहेत. त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यावेळी ५ खातेदारांची पोलिसांना ओळख पटली. हे ५ जण डोंबिवली आणि कल्याणमधील होते. विशेष म्हणजे या ५ मधील २ जण चालक, तर ३ जण लोडरचे काम करायचे. मात्र बँकेत दिलेल्या माहितीत ते इंटरनॅशनल कंपनीचे मालक असल्याचं दाखवलं होतं.



फसवणूक करून सह्या

त्यानुसार पोलिस या मजुरांच्या घरी आले. चौकशीत ते विविध कंपनीचे मालक असल्याचं बँकेत नमूद असल्याचं कळाल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कालांतराने पोलिसांनी या प्रकरणाची पार्श्वभूमी मजुरांना समजवून सांगितल्यानंतर आणि अटक आरोपीच नाव कळाल्यानंतर मजुरांना आपली झालेली फसवणूक लक्षात आली. अटक आरोपी सुनिल चौधरीने या आरोपींकडून विविध कामे करून देण्याच्या बहाण्याने फाॅर्मवर सह्या घेतल्या होत्या. मजूर आणि चालकांनीही न बघताच सह्या केल्या. मात्र प्रकरण पुढे आल्यानंतर त्या सह्या मजूरांनी बँकेच्या फाॅर्मवर घेतल्याचं उघड झालं.


कुणाचं लेटरहेड?

पुढे पोलिस तपासात बँकेत खाते उघडण्यासाठी बनावट पॅनकार्डचा वापर करण्यात आल्याचं लक्षात आल्यानंतर निवासी दाखल्याची चौकशी करण्यात आली. त्यात पोलिसांनी हस्तगत केलेल्या ८१ पॅनकार्डसाठी नेते मंडळीच्या लेटरहेडचा वापर करण्यात आला होता. हे लेटरहेड काँग्रेसचे आमदार आमीन पटेल, भाजपाचे माजी नगरसेवक महंत चौबे, आणि काँग्रेस नगरसेविका सुप्रिया सुनिल मोरे यांचं असल्याचं चौकशीत पुढे आलं आहे.


पोलिस करणार चौकशी

आमीन पटेल यांची २ लेटरहेड, नगरसेविका सुप्रिया मोरे यांचं १ लेटरहेट आणि महंत चौबे यांच्या नावाची १५ ते २० लेटरहेड फसवणुकीसाठी वापरण्यात आलं आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आमीन पटेल यांचे स्वीय सहाय्यक यांची चौकशी केली असून उर्वरित माजी नगरसेवक महंत आणि नगरसेविका सुप्रिया मोरे यांची गुन्हे शाखा २ चे पोलिस लवकरच चौकशी करणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.



हेही वाचा-

ड्रायव्हर-लोडरच्या नावावर कंपन्या! पायधुनीत कस्टम लायसन्सचा घोटाळा उघड



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा