पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयावर नातेवाईकांचा मोर्चा

 Pali Hill
पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयावर नातेवाईकांचा मोर्चा

मुंबई - घरावर मिर्ची सुखवण्यासाठी चढलेल्या प्रशांत दरवेशी (19) या तरुणाचा घरावरुन खाली पडून मृत्यू झाल्याची घटना महिनाभरापूर्वी चेंबूरमध्ये घडली होती. मात्र डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे. मुलावर तत्काळ उपचार न केल्यानं हा मुलगा दगावला असून, त्याच्या मृत्यूला जवाबदार असलेल्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मुलाच्या नातेवाईकांची आहे. मात्र पोलीस दुर्लक्ष करीत असल्यानं मुलाच्या नातेवाईकांनी मंगळवारी झोन सहाचे पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांच्या कार्यालयावर मोर्चा काढत त्यांची भेट घेतली. तसेच दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलीस उपायुक्तांकडे केलीय.

Loading Comments