आग्रीपाडा आणि सांताक्रूझ मधून लाखो रुपयांचा मास्कचा साठा जप्त


आग्रीपाडा आणि सांताक्रूझ मधून  लाखो रुपयांचा मास्कचा साठा जप्त
SHARES
देशभरासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामध्ये मुंबईचा अव्वल क्रमांक आहे. सरकार पातळीवर कोरोनाला रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. देशभरात जमाव बंदीसह लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांना मास्कच्या वापर करण्याबरोबरच हात सॅनिटायझरने धुण्याचा सूचना दिल्या जात आहे. परिणामी या दोन्ही वस्तूंची मागणी प्रचंड वाढली आहे. याचाच काहीजण गैरफायदा घेताना दिसत आहेत.


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ मार्च रोजीच्या अधिसूचनेप्रमाणे मास्क व हॅन्ड सॅनिटायझर यांची किंमतदेखील नमूद केली आहे. या वस्तूंचा काळाबाजार होणार नाही तसेच नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत प्रशासनाकडून निर्देश देण्यात आलेले आहेत. मात्र असे असूनही मुंबईतील आग्रीपाडा आणि सांताक्रूझ मध्ये अनधिकृत रित्या मास्कचा साठा केला जात असल्याचे पोलिस कारवाईतून पुढे आले आहे. आग्रीपाडा पोलिसांनी 8 लाख 25 हजाराचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दुकान मालकावर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
 
तर सांताक्रूझमध्ये पोलिसांनी तब्बल 32 लाख 84 हजारांचे मास्कचा साठा हस्तगत केला आहे. काही दिवसांपूर्वीच सांताक्रूझच्या विमानतळ परिसरातून गुन्हे शाखा 9 च्या पोलिसांनी 24 लाखांचा मास्कचा साठा हस्तगत केला होता. या परिसरातील ही दुसरी मोठी घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी महेंद्र कोरे नावाच्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा