या अभिनेत्याच्या बहिणीची NCBने ड्रग्ज प्रकरणात केली ६ तास चौकशी


या अभिनेत्याच्या बहिणीची NCBने ड्रग्ज प्रकरणात केली ६ तास चौकशी
SHARES

मुंबईत सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर NCB च्या  अधिकाऱ्यांनी शहरातील ड्रग्ज तस्करांची नांगी आवळण्यास सुरूवात केली. या कारवाई दरम्यान काही सेलिब्रिटीही NCB अधिकाऱ्यांच्या गळाला लागले. काही दिवसांपूर्वी अर्जुन रामपाल यांची या प्रकरणात चौकशी झाल्यानंतर त्याची बहिण कोमल राजपाल हिला चौकशीला NCBने बोलावले होते. तब्बल ६ तास कसून चौकशी केल्यानंतर कोमलला NCBच्या अधिकाऱ्यांनी जाऊ दिले.

हेही वाचाः- ड्रग्ज तस्करी प्रकरणात मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालाची NCB कडून अटक

अभिनेता अर्जुन रामपालच्या घरी काही दिवसांपूर्वी NCB ने कारवाई केली होती. त्यावेळी त्याच्या घरी अधिकाऱ्यांना काही प्रतिबंधात्मक औषध मिळाली होती. या औषधांचा वापर नशेसाठी वापरला गेल्याचा संशय NCB च्या अधिकाऱ्यांना असल्याने त्यांनी अर्जुन रामपालला चौकशीला बोलावले होते. त्यावेळी ते औषध बहिणीचं असल्याचा दावा अर्जुनने केला होता. त्यामुळे अर्जुनची बहिण कोमल हिला NCB  च्या अधिकाऱ्यांनी चौकशीला बोलावले होते. त्यानुसार कोमल सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास NCB च्या कार्यालयात हजर राहिली होती.

हेही वाचाः- ११वीच्या प्रथम प्राधान्य फेरीसाठी 'इतक्या' जागा

तब्बल ६ तासाच्या चौकशीनंतर NCB च्या अधिकार्यांनी कोमलला जाऊ दिले. जी औषध अर्जुन रामपालच्या घरी सापडली होती. त्याचं प्रसिक्रिपशन ज्या डाँक्टराने दिलं आहे. त्याने मात्र ही औषध आपण अर्जुन रामपालच्या मित्राच्या मित्राला दिल्याचा दावा केला आहे. या पूर्वी या ड्रग्ज कनेक्शन मध्ये काँमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचियाला NCBने अटक केली होती. सध्या हे दोघंही जामीनावर आहेत.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा