ड्रग्ज तस्करी प्रकरणात मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालाची NCB कडून अटक


ड्रग्ज तस्करी प्रकरणात मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालाची NCB कडून अटक
SHARES

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनविरोधात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) धडक कारवाई सुरू केली. या प्रकरणी NCB ने सोमवारी दिया मिर्जाची एक्स मॅनेजर राहिला फर्निचरवाला, कोमल रामपाल आणि प्रसिद्ध मुच्छड पानवाला दुकानाचे मालक रामकुमार तिवारी यांची कसून चौकशी केली त्यात त्याचा सहभाग निश्चित झाल्यानंतर NCB ने त्याला अटक केली.

हेही वाचाः- बर्ड फ्लू धोकादायक, राज्यात हायअलर्ट घोषित करण्याची गरज- राजेश टोपे

मिळालेल्या माहितीनुसार, दिया मिर्याची एक्स मॅनेजर फर्निचरवाला प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुच्छड पानवाला यांना समन्स बजावण्यात आले आहे. एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी दोन दिवसांपूर्वी रोहिला फर्निचरवाला यांच्यासह करन सजनानी, शाइस्ता हिला पकडले होते. त्यावेळी एनसीबीने यांच्याकडून तब्बल २०० किलो गांजा जप्त केला आहे. चौकशीदरम्यान एनसीबीला कळले की, करण सजनानी हा ब्रिटीश नागरिक मुच्छड पानवालाला गांजाचा पुरवठा करतो. करण सजनानी यांच्या निवेदनात मुच्छड पानवालाचे नाव समोर आल्यानंतर एनसीबीने समन्स पाठवले होते. त्यानुसार NCB च्या चौकशीसाठी रामकुमार तिवारी हे सोमवारी चौकशीसाठी हजर राहिले. तब्बल ६ तासाच्या चौकशीनंतर त्यांना NCBच्या अधिकाऱ्यांना तिवारीचा सहभाग आढळून आल्यानंतर त्याला अटक केली. 

हेही वाचाः- बेरोजगारांसाठी खूशखबर, पोलीस दलात तब्बल १२ हजार पदांची भरती

मुच्छड पानवाला दुकानाचे मालक रामकुमार तिवारी यांचे दुकान दक्षिण मुंबईतील केम्प कॉर्नरमध्ये आहे. या दुकानात पानमध्ये ड्रग्ज मिळवून दिले जात असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या दुकानातील पान खाण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसह मुंबईतील मोठे उद्योगपतीदेखील येत होते. प्रसार माध्यमांत झळकत असलेल्या वृत्तानुसार, आरोपी मुच्छद पानवालाला ड्रग्जचा पुरवठा करत असल्याचे म्हंटले गेले आहे. ड्रग्ज आणि पानवाला यांच्यातील संबंध काही नवीन नाही. याआधीही अशी अनेक प्रकरणे घडली आहेत, जिथे पान विकणाऱ्या लोकांना ड्रग्ज प्रकरणात अटक केली गेली आहे.

कोण आहे हा मुच्छड पानवाला ज्याला NCB ने चौकशीसाठी बोलावलं

अलाहाबादच्या हंडीया जिल्ह्यात राहणारे जयशंकर तिवारी मुच्छड पानवाला म्हणून प्रसिद्ध आहेत.१९७७ मध्ये ते प्रथमच मुंबईत आले आणि वडिलांचा पान व्यवसाय सुरू केला. त्यांनी आपली पान विक्री करण्यासाठी स्वतःची वेबसाइटही तयार केली आहे, ज्यावर केवळ मुंबईतूनच नव्हे तर जगभरातूनही ऑर्डर स्विकारल्या जातात. दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू परिसरात एक करोडपती पानवाला म्हणून तिवारीची वेगळी ओळख आहे. मुंबईत करोडपती विक्रेत्यांच्या यादीत जयशंकर तिवारी यांचेही नाव अग्रस्थानी आहे. जयशंकर तिवारीची ग्राहकांची यादीही बरीच मोठी आहे, ज्यात मोठे मोठे उद्योगपती, क्रिकेटपटू आणि बॉलिवूडचे अनेक स्टार यांचा समावेश आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा