Advertisement

बर्ड फ्लू धोकादायक, राज्यात हायअलर्ट घोषित करण्याची गरज- राजेश टोपे

बर्ड फ्लू आजार अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात हायअलर्ट घोषित करण्याची गरज आहे, असं वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं.

बर्ड फ्लू धोकादायक, राज्यात हायअलर्ट घोषित करण्याची गरज- राजेश टोपे
SHARES

मुंबईसह महाराष्ट्रातील (maharashtra) काही जिल्ह्यांत हळुहळू डोकं वर काढत असलेला बर्ड फ्लू आजार अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात हायअलर्ट घोषित करण्याची गरज आहे, असं वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. पक्षांच्या माध्यमातून बर्ड फ्लूचा विषाणू मानवाच्या शरिरातही प्रवेश करतो. या आजाराचा मृत्यूदर हा १० ते १२ टक्के इतका आहे. याकडे पाहता बर्ड फ्लू अत्यंत धोकादायक ठरू शकतो. म्हणूनच या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाने अलर्ट घोषित करणं गरजेचं आहे, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

बर्ड फ्लू बाबतची माहिती कळताच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सायंकाळी ५ वाजता तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत बर्ड फ्लू संदर्भातील स्थिती आणि उपाययोजनांचे ते आढावा घेणार आहेत.

हेही वाचा- Bird Flu: अंडी-चिकन खाणाऱ्यांना महत्त्वाचा सल्ला!

परभणी जिल्ह्यातील मुरूंबा गावात बचत गटाच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या पोल्ट्री फार्ममधील ८०० कोंबड्या एकाच दिवशी मरण पावल्या. या पोल्ट्री फॉर्ममध्ये ८००० हजार कोंबड्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने या कोंबड्यांचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. वैद्यकीय चिकित्सेनंतर कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

मुंबईत चिकनच्या किंमती १० ते २० रुपयांनी (प्रती किलो) घटल्या आहेत. या किंमतीसंदर्भातील अहवाल शनिवारी, ९ जानेवारी, २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. त्यामागील कारण ग्राहकांची भीती असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या सुरू असलेल्या बर्ड फ्लूच्या भीतीमुळे लोक पोल्ट्री मांस आणि उत्पादनांपासून स्वत:ला दूर ठेवत आहेत. या आधारावरच व्यावसायिकांकडून पक्ष्यांची विल्हेवाट लावली जात आहे.

याबाबत बोलताना पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी सांगितलं की, अंडी किंवा कोंबडीचं मांस अर्धा तास विशिष्ट तापमाणावर शिजवल्यानंतर त्यातील जीवाणू मरून जातात, हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे चिकन किंवा अंड्याचे पदार्थ खाणाऱ्यांनी हे पदार्थ ७० अंश सेंटीग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून नंतरच खावेत. जेणेकरून कुठल्याही प्रकारचा धोका राहणार नाही. 

(maharashtra government must declare high alert on bird flu infection demands health minister rajesh tope)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा