Advertisement

मुंबईत चिकनच्या किंमतीत १० ते २० रुपयांची घसरण

मुंबईत बर्ड फ्ल्यू नोंद झालेली नसली तरी उत्तरेकडील भीतीमुळे कोंबडीच्या किंमतीत घसरण झाली आहे.

मुंबईत चिकनच्या किंमतीत १० ते २० रुपयांची घसरण
SHARES

भारताच्या उत्तरेकडील भागातील काही शहरांमध्ये बर्ड फ्लूचा प्रसार होताना दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात पोल्ट्री व्यवसायाच्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे. मुंबईत बर्ड फ्ल्यू नोंद झालेली नसली तरी उत्तरेकडील  भीतीमुळे कोंबडीच्या किंमतीत घसरण झाली आहे.

रिपोर्टनुसार, मुंबईत कोंबडीच्या किंमती १० ते २० रुपयांनी (प्रती किलो) घटल्या आहेत. या किंमतीसंदर्भातील अहवाल शनिवारी, ९ जानेवारी, २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. त्यामागील कारण ग्राहकांची भीती असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या सुरू असलेल्या बर्ड फ्लूच्या भीतीमुळे लोक पोल्ट्री मांस आणि उत्पादनांपासून स्वत:ला दूर ठेवत आहेत. या आधारावरच व्यावसायिकांनी पक्ष्यांची विल्हेवाट लावली आहे.

राज्यात कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणारे आणि मांसाच्या दुकानांच्या मालकांनुसार, राज्यात अशा घटनेची नोंद नाही. पण लोकांच्या मनात भिती बसली आहे. त्यामुळे विक्रित ५० टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे मांसाची सरासरी किंमत २० नं कमी झाली आहे.

आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की, मुंबईतील बॉयलरची किंमत आयएनआर ७५ पर्यंत खाली आली आहे. जी आधी प्रति किलो आयएनआर ९५ नोंदवली गेली होती.



हेही वाचा

विद्यार्थ्यांसाठी महापालिका करणार २० कोटींच्या मास्कची खरेदी

विनातिकीट प्रवास करणाऱ्या 'इतक्या' प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा