साजिद खाननंही केलं आयपीएलमध्ये बेटिंग

बेटिंग प्रकरणात अभिनेता अरबाझ खान, दिग्दर्शक पराग संघवी यांच्यानंतर आता निर्माता आणि दिग्दर्शक साजिद खान याचंही नाव पुढे आलं आहे. २००८ मध्ये साजिद खाननं आपल्या माध्यमातून क्रिकेटवर सट्टा लावल्याची माहिती जालान यानं दिली आहे.

साजिद खाननंही केलं आयपीएलमध्ये बेटिंग
SHARES

आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात मुख्य आरोपी सोनू जलानच्या चौकशीतून अनेक अभिनेते आणि निर्मात्यांची नावं पुढं येऊ लागली आहेत. या प्रकरणात अभिनेता अरबाझ खान, दिग्दर्शक पराग संघवी यांच्यानंतर आता निर्माता आणि दिग्दर्शक साजिद खान याचंही नाव पुढे आलं आहे. २००८ मध्ये साजिद खाननं आपल्या माध्यमातून क्रिकेटवर सट्टा लावल्याची माहिती जालान यानं दिली आहे.


उच्चभ्रू लोकांची यादी

कुख्यात बुकी सोनू जलान याने आपल्या चौकशीत आतापर्यंत त्याच्या मदतीने सट्टा लावणाऱ्या उच्चभ्रू लोकांची यादीच पोलिसांना दिली आहे. त्यामध्ये बाॅलिवूडमधील अनेक तारका, अभिनेते आणि दिग्दर्शकांसह मोठ मोठ्या व्यावसायिकांची नावे असल्याचं म्हटलं जात आहे. सोनूने दिग्दर्शक साजिद खान याचं नाव पोलिसांपुढं उघड केलं आहे.


लवकरच चौकशी

साजिद खान यानेदेखील माझ्याकडून आयपीएलमध्ये सट्टा लावला होता मात्र, यादरम्यान कोणताही आर्थिक व्यवहार झाला नसल्याचंही जलान यानं सांगितलं. हे प्रकरण आता जुनं असल्यानं त्याचे पुरावे पोलिसांना मिळू शकलेले नाहीत. आयपीएल सट्टा प्रकरणात ठाणे खंडणीविरोधी पथकाकडून अटकेत असलेला बुकी जलान याची कसून चौकशी सुरु आहे. जलाननं साजिदची माहिती पोलिसांना दिल्यामुळं या प्रकरणात साजिदला लवकरच चौकशीला बोलावलं जाण्याची शक्यता आहे.हेही वाचा-

असा खेळला जातो क्रिकेट सामन्यांवर सट्टा!

आयपीएल बेटिंग: बुकी सोनू जलानला लावणार मकोका!Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा