अायपीएल सट्टेबाजीप्रकरणी अभिनेता अरबाझ खानला समन्स


अायपीएल सट्टेबाजीप्रकरणी अभिनेता अरबाझ खानला समन्स
SHARES

अायपीएलमधील सट्टेबाजीप्रकरणी ठाणे पोलिसांनी सट्टेबाजांच्या मुसक्या अावळण्यास सुरुवात केली अाहे. दोन दिवसांपूर्वी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने अायपीएल सट्टेबाजीप्रकरणी सहाव्या अारोपीला अटक केली अाहे. अांतरराष्ट्रीय कुख्यात बुकी सोनू जलान उर्फ सोनू बाटला  (वय ४१, मालाड) या सहाव्या अारोपीला पोलिसांनी पकडले असून त्याच्याकडून अनेक धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली अाहे. अायपीएल सट्टेबाजीचे बाॅलीवूड कनेक्शनही समोर अाले असून अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाझ खान याला पोलिसांनी समन्स पाठवला अाहे.


बेटिंगचे बाॅलिवुड कनेक्शन

सोनू जलान याचे थेट पाकिस्तान कनेक्शन असल्याचा पोलिसांना संशय अाहे. सोनूने चौकशीत दिलेल्या माहितीनुसार, बाॅलिवुडमधील अनेक दिग्गज सेलिब्रेटींनी मुंबई इंडियन्स विरुद्ध राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यावर सट्टा लावला होता. अनेक अभिनेते नाव बदलून सट्टा खेळत होते. 



अरबाझ खानला समन्स

पोलिसांना नाव सांगणार नाही, या अटीवर सोनू यानं अरबाझकडे पैशांची मागणीही केली होती. हा प्रकार उघडकीस अाल्यानंतर अाता अरबाझ खानची चौकशी होणार अाहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी अरबाझ खानला अापलं मत मांडण्यासाठी अाणि पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावलं अाहे. 


डोंबिवलीतून पाच जणांना अटक

डोंबिवलीत आयपीएलवर सट्टा खेळला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. त्याआधारे रामनगर परिसरातून १६ मे रोजी शर्मा यांच्या पथकानं गौतम सावला (५५), निखिल (२५, दोघेही रा. डोंबिवली) आणि नितीश पुंजानी (५५, रा. ठाणे) यांना अटक केली होती. त्यांच्याच माहितीच्या आधारे पुढे खुशाल रामा भिया (४०, मालाड) आणि बिट्टू व्रजेश जोशी (२७, मुलुंड) या दोघांना मुंबईतून अलिकडेच ठाणे खंडणीविरोधी पथकानं अटक केली होती.



सोनू जलालवर अनेक गुन्हे

सोनू जलालवर मालाड (२००८), ओशिवरा (२०११), समाजसेवा शाखा (२०११), तर २०१५ मध्ये दिल्ली आणि अहमदाबाद येथील पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. कासारवडवली आणि डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यातही त्यांच्यावर क्रिकेटवर सट्टा लावल्याप्रकरणी गुन्हे दाखल असल्याचे सूत्रांनी सांगितले.


हेही वाचा -

ऑनलाईन सट्टेबाजारात 'मुंबई इंडियन्स'ला सर्वाधिक पसंती

अर्जुन रामपालच्या भाऊजीला क्रिकेट बेटींग प्रकरणी अटक

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा