अर्जुन रामपालच्या भाऊजीला क्रिकेट बेटींग प्रकरणी अटक


अर्जुन रामपालच्या भाऊजीला क्रिकेट बेटींग प्रकरणी अटक
SHARES

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीच्या नवऱ्याला मुंबई गुन्हे शाखेने सट्टा प्रकरणात अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमित गिल (४३) असं त्याच नाव असून त्याला भारत आणि श्रीलंकेदरम्यान झालेल्या क्रिकेट सामान्यावर सट्टा लावल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

अमित गिलला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आल्यावर न्यायालयाने त्याला ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

२४ ऑगस्टला भारत विरुद्ध श्रीलंकेच्या सामान्यादरम्यान सट्टेबाजी सुरु असल्याची खबर गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेने ओशिवरा येथे छापा टाकत दीपक कपूर नावाच्या बुकीसह तरुण ठाकूर आणि सनी ठाकूर अश्या एकूण तिघांना अटक केली. गुन्हे शाखेने या छाप्यात एकूण १३ मोबाइल, २ लॅपटॉप आणि डायरी जप्त केली.


२० लाखांसाठी

सट्टा प्रकरणाच्या तपासात अर्जुन कपूरचा भाऊजी अमित गिलचं नाव समोर येताच त्याला मंगळवारी रात्री सांताक्रूझ येथील निवासस्थानी अटक करण्यात आली. ''दीपक कपूर हा माझे २० लाख रुपये देणे लागत होता. पण तो पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. त्यामुळे मी त्याला त्याच्याकडे पडून असलेल्या माझ्या पैशांतून सट्टा लावण्यास सांगितलं, असं गिलने गुन्हे शाखेला सांगितलं.


साॅफ्टवेअर 'बिंगो'

आरोपींमध्ये एक सॉफ्टवेअर इंजिनीयर असून त्याने सट्टा लावण्यासाठी 'बिंगो' नावाचं सॉफ्टवेअर बनवलं होतं. तपास यंत्रणांपासून वाचण्यासाठी या सॉफ्टवेअरचा सर्व्हर परदेशात असल्याचं समजत आहे.


दुबईपर्यंत नेटवर्क

या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा कक्ष ९ करत असून आतापर्यंत अमितसह एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या बेटींग रॅकेटमध्ये सहभागी असलेले सर्व बुकी नावाजलेले बुकी असून मुंबईसह दिल्ली, अहमदाबाद आणि दुबईपर्यँत त्यांचे नेटवर्क असल्याचे म्हटले जात आहेत. त्यामुळे या प्रकरणीत आणखी मोठी नावं अडकण्याची शक्यता गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.हेही वाचा -

ठाण्यात लहान मुलांना विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तान्ह्या मुलाची सुटका

पत्नींची अदलाबदल करण्यावरुन व्यापाऱ्याची हत्याडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय