ठाण्यात लहान मुलांना विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तान्ह्या मुलाची सुटका


ठाण्यात लहान मुलांना विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तान्ह्या मुलाची सुटका
SHARES

ठाणे पोलिसांनी लहान मुलांना विकणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सहा महिलांसह एकूण आठ जणांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.


कसा लागला शोध?

लहान मूल विकण्यासाठी दोन इसम मुलुंड चेक नाका परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या कक्ष १ ला मिळाली. त्यानुसार मुलुंड चेक नाका परिसरातील हॉटेलजवळ रविवारी त्यांनी पाळत ठेवली. संध्याकाळच्या सुमारास त्यांना एक महिन्याचं तान्हं मूल हातात घेतलेलं एक जोडपं त्याच परिसरात फिरताना आढळलं. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना हटकलं. त्यांची माहिती विचारली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली. आता मात्र पोलिसांचा संशय बळावला आणि दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं.


आरोपींचा कबुलीजबाब

चौकशीत या दोघांनी ते मूल विकण्यासाठी मुंबईला आणल्याचं कबूल केलं. एका इसमासोबत १ लाख ३५ हजार रुपयांना सौदा ठरल्याचं देखील त्यांनी पोलिसांना सांगितलं. या दोघांनी पोलिसांना सांगितलं, की अहमदनगरवरून या तान्ह्या मुलाला विकण्यासाठी मुंब्र्याला आणण्यात आलं होतं. त्यानंतर दोन महिलांकडे या मुलाला सोपवण्यात आलं, ज्यांनी मुलाला विकण्यासाठी आपल्याकडे सोपवल्याचं महिलेने पोलिसांना सांगितलं.

या दोघांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आणखीन पाच महिलांसह एकाला मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळून अटक केली. सध्या या तान्ह्या मुलाला ठाण्यातील चाईल्ड केअर सेंटरकडे सोपवण्यात आलं आहे.



हेही वाचा

स्वत:च्याच अपहरणाचा बनाव आणि 50 लाखांची खंडणी!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा