गळफास घेऊन आरोपीने लॉकअपमध्येच स्वत:ला संपवलं

मुंबईतील पवई परिसरात एअर होस्टेसच्या हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती.

गळफास घेऊन आरोपीने लॉकअपमध्येच स्वत:ला संपवलं
SHARES

चार दिवसांपूर्वी मुंबईत (Mumbai News) रुपल ओग्रे (Rupal Oghre) नावाच्या एअरहोस्टेची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) याप्रकरणात एका सफाई कर्मचाऱ्याला अटक केली होती. आरोपीने गळा चिरून रुपची हत्या केली होती. पोलिसांनी अवघ्या 12 तासांत आरोपील ताब्यात घेत अटक केली होती. त्यानंतर आता या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

मुंबईतील पवई परिसरात एअर होस्टेसच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीने लॉकअपमध्ये आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. लॉकअपमध्ये कैद असलेल्या आरोपीने चड्डीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

शुक्रवारी सकाळी आरोपीचा मृतदेह लॉकअपमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.आरोपी हे मृत एअर होस्टेसच्या सोसायटीत साफसफाईचे काम करायचे. आरोपीने हा खून का केला याचा तपास पोलीस करत असून नुकतेच त्याला लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते.

आरोपी 35 वर्षीय विक्रम अटवालने (40) आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. पवई पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याला अंधेरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं.

अंधेरी पोलीस ठाण्यामध्येच लॉकअपमध्ये गळफास घेऊन आरोपीने आत्महत्या केली आहे. आज आरोपी अटवालची न्यायालयात त्याची पेशी होणार होती. मात्र त्याआधीच विक्रमने स्वच्छता गृहात पॅंटच्या सहाय्याने गळफास घेतला.



पालघर : चोर असल्याच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

मुंबई लोकलमध्ये सर्रासपणे ड्रग्सचे सेवन, व्हिडिओ व्हायरल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा