मुंबई विमानतळावर दीड किलो सोनं जप्त

 Sahar airport
मुंबई विमानतळावर दीड किलो सोनं जप्त
मुंबई विमानतळावर दीड किलो सोनं जप्त
See all

मुंबई - मुंबई विमानतळावर गेल्या दोन दिवसांत कस्टम विभागाने तब्बल दीड किलो सोनं जप्त केलं आहे. या सोन्याची अंदाजे किंमत ४२ लाख रुपये  असून याप्रकरणी कस्टम विभागाने चौघांना अटक केली आहे.

बुधवारी कस्टम विभागाने भुवनेश्वरहून आलेल्या अफझल श्रॉफ, सलीम अन्वर शेख आणि वागळे नावाच्या तिघांना संशयावरून ताब्यात घेतलं. त्यांच्या सामानाची तपासणी केली असता प्रत्येकी 10 तोळ्यांचे चार सोन्याचे बार आणि दोन सोन्याचे बार जप्त केले आहेत. या सोन्याची किंमत जवळपास 15 लाख 39 हजार आहे.

गुरुवारी कस्टम विभागाने कुवैतहून मुंबईत आलेल्या मोहम्मद अब्दुल शुकूर नावाच्या प्रवाश्याकडून प्रत्येकी अर्धा किलोचे दोन सोन्याचे बार जप्त केले. या सोन्याची किंमत 26 लाख 40 हजार रुपये एवढी आहे. सोन्याच्या या दोन तुकड्यांना स्पीकरच्या पार्टचा आकार देण्यात आला होता. त्यानंतर हे दोन्ही तुकडे स्पिकरला बसवण्यात आले होते. विशेष म्हणजे कस्टमची नजर चुकवण्यासाठी त्यांना सोन्याचा मुलामा देखील देण्यात आला होता.

Loading Comments