अवैध गुटखा जप्त

 Goregaon
अवैध गुटखा जप्त
अवैध गुटखा जप्त
अवैध गुटखा जप्त
See all

गोरेगाव - गोरेगाव पूर्वमधील आरे कॉलनीतील एका स्थानिकानं दोन गोनी भरुन अवैध गुटखा पकडून आपल्या कर्तव्याचं पालन केलं. 3 नोव्हेंबरला एका स्कुटीवरुन दोन जण आरे कॉलनी नं. 7 च्या दिशेनं गोनी भरुन गुटखा घेऊन जात असल्याचा संशय राजेशला आला. त्याने त्या दोघांना विचारलं असता ते दोघंही त्या गोन्या तिथेच टाकून पळून गेले. त्याने लगेचच पोलिसांना संपर्क केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर दोन्ही गोनीत गुटखा असल्याचं माहित झालं. त्यानंतर एफडीए अधिकारी ही घटनास्थळी दाखल झाले. या सर्व घटनेची पोलीस आणि एफडीए अधिकारी चौकशी करत आहेत.

Loading Comments