मुंबई हल्ल्यामधील हिरोचा अखेर मृत्यू

 Pali Hill
मुंबई हल्ल्यामधील हिरोचा अखेर मृत्यू

मुंबई - २६/११ हल्ल्यात बॉम्ब शोधण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सीझर या श्वानाचा गुरुवारी विरार येथे मृत्यू झाला. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरु होते. मुंबई पोलिसांच्या श्वान पथकातील ‘सीझर‘ हा गेल्या वर्षभरात मृत्यू पावलेला चौथा आणि शेवटचा श्वान होता. हल्ल्याच्या वेळी बॉम्ब शोधण्यासाठी त्याने मुंबई पोलिसांना मोठी मदत केली होती. गेल्या वर्षभरात मॅक्स, टायगर आणि सुलतान या तीन श्वानांचा देखील मृत्यू झाला. तेव्हापासून तो तणावाखाली असल्याचं त्याची देखभाल करणाऱ्या एका प्राणी मित्राने सांगितलं. ‘सीझर’वर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Loading Comments