महिला आयोग चौकशी अहवाल मागवणार

 Pali Hill
महिला आयोग चौकशी अहवाल मागवणार

मुंबई - पाडव्याच्या दिवशी मुंबईत झालेल्या सामूहिक बलात्काराची राज्य महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी आरोपींना लगेचच अटक झाली, ही चांगली बाब आहे. पण चार्टशीट दाखल करण्याची प्रक्रियाही वेगाने पूर्ण करावी, अशी मागणी आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केलीये. या प्रकरणाचा चौकशी अहवाल पोलिसांनी आयोगाकडे सादर करण्यासंबंधीचं पत्र बुधवारी पाठवण्यात येणार असल्याचंही रहाटकर यांनी मुंबई लाइव्हला सांगितलं. या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. यासाठी जनजागृतीपर उपाययोजना करता येतील का, याचा विचार आयोगाकडून सुरू असल्याचंही रहाटकर यांनी स्पष्ट केलंय.

Loading Comments