अनन्या पांडेची तिसऱ्यांदा चौकशी होणार

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिला मुंबई क्रूझ पार्टी ड्रग्ज प्रकरणात सोमवारी पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश अमली पदार्थ नियंत्रण विभागाने दिले आहेत.

अनन्या पांडेची तिसऱ्यांदा चौकशी होणार
SHARES

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिला मुंबई क्रूझ पार्टी ड्रग्ज प्रकरणात सोमवारी पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश अमली पदार्थ नियंत्रण विभागाने दिले आहेत. गेल्या गुरुवारी अनन्याला पहिल्यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी २ तास तिची चौकशी करण्यात आली. तिच्याकडचे २ मोबाइल आणि तिचा लॅपटॉपही एनसीबीनं ताब्यात घेतला. त्यानंतर चौकशीची दुसरी फेरी शुक्रवारी झाली.

शुक्रवारी झालेल्या चोकशी साधारणतः ४ तास करण्यात आली. मात्र या चौकशीत काहीही ठोस पुरावे आढळले नसल्याने तिला सोमवारी पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

याच प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. अनन्याची आज तिसऱ्यांदा चौकशी होणार आहे.

अनन्या आणि आर्यन या दोघांमधले ड्रग्जच्या संदर्भातले चॅट्स समोर आल्यानंतर तिला पहिल्यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आलं. हे दोघेही गांजाबद्दल चर्चा करत होते. एनसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन अनन्याला गांजाविषयी विचारत होता.

ती गांजा मिळवण्यासाठी काही ‘जुगाड’ करू शकते का? असंही त्याने तिला विचारलं. त्यावर ‘मी तुला ते मिळवून देईन’ असं उत्तर अनन्याने दिलं.

एनसीबीच्या तपास अधिकाऱ्यांनी जेव्हा हे चॅट अनन्याला दाखवून त्याविषयी तिला विचारलं, त्यावेळी आपण केवळ थट्टा करत असल्याचं तिने अधिकारऱ्यांना सांगितलं. या चॅट्सशिवाय अनन्याने आर्यनला ड्रग्ज पुरवले याविषयीचे कोणतेही पुरावे एनसीबीच्या हाती लागलेले नाहीत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा