पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रक्षकाला लुटणाऱ्या टोळीतल्या दोघांना अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रक्षकाला लुटणाऱ्या टोळीतल्या दोघांना एका महिन्याच्या आतच GRPनं अटक केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रक्षकाला लुटणाऱ्या टोळीतल्या दोघांना अटक
SHARES

अंधेरी रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) रेल्वे प्रवाशांची पाकिटे लुटणाऱ्या दोघांना अटक केली आहे. विषेश म्हणजे प्रवाशांना पाकिट लुटल्याचं कळण्याआधीच त्यांच्या खात्यातून क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे ही टोळी पैसे काढण्यात सराईत होती.

पण त्यांच्याकडून एक मोठी चूक झाली ती म्हणजे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष संरक्षण गटाच्या (एसपीजी) सदस्याला लुटले. रानू वीरेंद्र पांडे आणि हैदर शेख अशी आरोपींची नावं आहेत. या दोघांनी एसपीजी सदस्याचं पाकिट चोरून त्यातील डेबिट कार्डनं पैसे काढले.

जीआरपी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही घटना ६ नोव्हेंबर रोजी घडली, जेव्हा पीडित ओरिसातून मित्राला भेटण्यासाठी मुंबईत आला होती. पीडित विलेपार्ले ते प्रभादेवी लोकल ट्रेनमध्ये चढला होती. पीडित माहीम स्टेशनवर पोहोचल्यावर त्याच्या मोबाईलवर खात्यातून पैसे काढल्याचा मेसेज आला. त्यानंतर त्यानं बॅग तपासली असता त्याचं पाकीट गायब असल्याचं आढळून आलं. त्यानंतर त्यांनं अंधेरी जीआरपीकडे जाऊन तक्रार नोंदवली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ताराय निकम यांनी तपास सुरू करून पांडेला अटक केली. चौकशीनंतर पोलिस अधिकाऱ्यांना कळलं की, पांडेने पीडितेचं पाकीट घेतलं आणि काही मिनिटांत ते शेखला दिलं ज्याने डेबिट कार्ड स्वाइप केलं, पैसे काढून घेतले आणि रानूला ४००० रुपये दिले.

त्यानंतर पोलिसांनी शेखला अटक केली. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ५० हून अधिक क्रेडिट आणि डेबिट कार्डे स्वाइप केल्याची कबुली त्यानं दिली. पोलिसांनी सांगितलं की, त्यांनी रेल्वे प्रवाशांची पाकिटे लुटणाऱ्या आरोपींना अटक करून एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या दोघांना आयपीसी आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांतर्गत चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे, असे अंधेरी जीआरपीच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.



हेही वाचा

परमबीर सिंह मुंबईत दाखल

शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशी हायकोर्टाकडून रद्द

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा