जव्हेरी बाजारातून 50 लाखांची रोकड जप्त

 Mohammad Ali Road
जव्हेरी बाजारातून 50 लाखांची रोकड जप्त

जव्हेरी बाजार - जव्हेरी बाजारात एका व्यक्तीकडून 50 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहेत. वसंत रेवारी असं त्याचं नाव आहे. नोटबंदीनंतर जव्हेरी बाजारातल्या अंगडियावर ही पहिलीच छापेमार आहे. जव्हेरी बाजारात मोठ्या प्रमाणात नवीन आणि जुन्या नोटा असल्याची माहिती क्राइम ब्रँचच्या युनिट 2ला मिळाली होती. या माहितीनुसार काळबादेवी पोलिसांनी जव्हेरी बाजारात सापळा रचला. त्याच वेळी वसंत रेवारी एका गाडीत मोठ्या बॅगा घेऊन जात असताना आढळला. पोलिसांनी त्याला अडवून चौकशी केली असता गाडीत 50 लाख रुपये असल्याचं समोर आलं. यामध्ये 47 लाखांच्या 2 हजार रुपयांच्या नवीन नोटा तर 3 लाखांच्या जुन्या नोटा आहेत. तर आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास प्राप्तिकर विभाग करणार आहे.

Loading Comments