मोबाइल न दिल्याच्या रागातून चेंबूरमध्ये पतीने केली पत्नीची हत्या

मोबाइल देण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला

मोबाइल न दिल्याच्या रागातून चेंबूरमध्ये पतीने केली पत्नीची हत्या
SHARES

मुंबईच्या आरसीएफ येथे पत्नीने मोबाइल न दिल्याच्या रागातून एका माथेफिरू पतीने पत्नीचीच धार धार शस्त्राने हत्या केल्याची घटना सोमवारी पुढे आली. राबिया जेम्स कुरियन असे मृत महिलेचे नाव आहे.  या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी जेम्स जाॅन कुरिअन उर्फ आसिफ बाबा शेख याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

हेही वाचाः- ​मिलिंद एकबोटे राज ठाकरेंच्या भेटीला​​​

मुंबईच्या चेंबूर येथील आएनएपार्क वाशी नाका येथील म्हाडा काॅलनीत राबिया या मुलगा जाॅनी जेम्स कुरियन आणि आरोपी जेम्स जाॅन कुरियन याच्यासोबत रहात होत्या, राबिया यांचा मुलगा जाॅनी हा खासगी गाडीवर चालक म्हणून काम करतो. तर जेम्स हा किरकोळ काम करतो. रविवारी रात्री आरोपी आसिफ याने राबियाकडे काही कारणास्तव तिचा मोबाइल मागितला. मात्र राबियाने त्याला मोबाइल देण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला. त्यावेळी जाॅनी हा कामावर होता. या वादाचे रुपांतर पुढे हाणामारीत झाले. त्यावेळी राग अनावर झालेल्या आसिफने घरातील चाकून राबियावर चाकून हल्ला केला. या हल्यात राबिया गंभीर जखमी झाली. 

हेही वाचाः- ​ डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय 'एन ९५ मास्क'ची विक्री नाही​​​

मदतीसाठी राबिया आरडाओरड करू लागल्यानंतर शेजारी तिच्या मदतीला धावले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राबियाला स्थानिकांनी जवळील शासकिय रुग्णालयात नेले. मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आसिफ विरोधात ३०२, ५०४,५०६ भा.द.वि कलमांर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केलीआहे. या प्रकरणी आरसीएफ पोलिस अधिक तपास करत आहेत. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा