500 रुपये सुट्टे नसल्यानं फोडलं दुकान

मानखुर्द - ही तोडफोड नेमकी कशासाठी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. ही तोडफोड झालीय 500 रुपये सुट्टे नसल्यानं आणि हे घडलंय मानखुर्द परिसरात. त्यासाठी आधी हे सीसीटीव्ही फुटेज नीट पाहा. मानखुर्दमध्ये दुकानाबाहेर चांगली गर्दी दिसतेय. अचानक एक तरूण पुढे येतो आणि खुर्ची घेऊन फेकतो. परत उचलतो परत फेकतो, मग घेतो एक फळकूट आणि दुकानातील वस्तूची तोडफोड करतो. हे बघा एवढ्यावरच हा थांबत नाही तर तो चक्क हातानं दुकानातील दिवाच फोडून टाकतो. मग काय एवढा वेळ बघ्याच्या भुमिकेत असलेले त्याचे साथीदारही चेतावतात आणि लाठ्याकाठ्यांनी दुकानाची तोडफोड करतात. कुणी बाहेर दुकानाची तोडफोड करतंय तर कुणी आतमध्ये शिरून दुकानावर हल्ला करतोय. या राड्या नंतर दुकानाची काय अवस्था झाली ते तुम्हीच बघा.

 

Loading Comments