हेलिकॉप्टर अपघातातील आणखी एकाचा मृत्यू

 Goregaon
हेलिकॉप्टर अपघातातील आणखी एकाचा मृत्यू

गोरेगाव - आरे कॉलनीत रविवारी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातातील जखमी रितेश मोदी (32) यांचं मंगळवारी रात्री सेव्हन हिल्स रुग्णालयात निधन झालं. त्यामुळे या अपघातातल्या मृतांची संख्या आता दोन झाली आहे. हेलिकॉप्टर पायलट प्रफुल्लकुमार मिश्रा यांचा या आधी, रविवारीच मृत्यू झाला होता.

जॉय राइडसाठी हे हेलिकॉप्टर ठाणे परिसरात गेलं होतं. ठाण्याहून परत येताना क्लचमध्ये बिघाड झाल्याचं पायलट मिश्रा यांच्या लक्षात आलं. त्यांनी फिल्मसिटीच्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र हेलिपॅडवर उतरता न आल्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करताना हे हेलिकॉप्टर कोसळून त्याला आग लागली होती.

Loading Comments