परमबीर सिंग यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात परमवीर सिंग यांच्याविरुद्ध कलम 384, 385, 388, 389, 420, 364 ए, 34 ,120 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परमबीर सिंग यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल
SHARES

मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर आता आणखी एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीकडून परमबीर सिंग यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली असा आरोप ठेवण्यात आला आहे.  

ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात परमवीर सिंग यांच्याविरुद्ध कलम 384, 385, 388, 389, 420, 364 ए, 34 ,120 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग व्यतिरिक्त संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि मनेरे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

याआधी गुरूवारीच परमबीर सिंह यांच्यावर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय मुंबई पोलीस दलातील इतर पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

बिल्डर श्याम सुंदर अगरवाल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परमबीर सिंह यांच्यासह डीसीपी अकबर पठाण, पोलीस अधिकारी श्रीकांत शिंदे, पीआय आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, खासगी इसम सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.  या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. संजय पुनमिया आणि सुनील जैन हे दोघे परमबीर यांच्यासाठी खंडणी उकळायचे असा आरोप आहे. 

केस मागे घेण्यासाठी बिल्डरकडून खंडणी मागितल्याचा आरोप परमबीर सिंग, अकबर पठाण यांच्यासह वरिष्ठ पोलिसांवर आहे. आपल्याविरुद्ध दाखल असलेल्या तक्रारी निकाली काढण्यासाठी १५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती, असा आरोप बिल्डरने तक्रारीत केला आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा