कोकेनची तस्करी करणारा 'गुडन्यूज' गजाआड

  Andheri
  कोकेनची तस्करी करणारा 'गुडन्यूज' गजाआड
  मुंबई  -  

  अंधेरीच्या तुळजाभवानी चौकातील 'कॅफे काॅफी डे' मध्ये कोकेनची तस्करी करण्यासाठी आलेल्या एका परदेशी नागरिकाला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. गुडन्यूज पिटर उबडी (24) असं अटक केलेल्या नागरिकाचे नाव असून, त्याच्याकडून 44 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

  जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात 2 लाख 20 हजार एवढी किंमत असून, हे कोकेन कुणाला देण्यासाठी आणले होते, याचा तपास पोलीस करत आहेत.

  अंधेरी लोखंडवाला येथील तुळजाभवानी चौकात असलेल्या कॅफे कॉफी डे येथे एक परदेशी नागरिक अंमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी सापळा लावला होता.

  अशातच एका परदेशी नागरिकाची संशयास्पद हालचाल सुरू असल्याचे पोलिसांना आढळले. यावेळी नागरिकाकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्याकडे 22 ग्रॅम कोकेन आढळले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.