मुंबईतील सायन परिसरातून २१ कोटींचे ड्रग्ज जप्त

मुंबईतील सायन परिसरातून तब्बल २१ कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईतील सायन परिसरातून २१ कोटींचे ड्रग्ज जप्त
SHARES

मुंबईतील सायन परिसरातून तब्बल २१ कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी एका ड्रग्ज पुरवठादाराला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई केली आहे.

जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जमध्ये सर्वच प्रकारच्या अमली पदार्थांचा समावेश आहे. कोकेन, हेरॉईन, चरस, एमडी, गांजा याचबरोबर एलसीडी डॉट्स, नशेच्या गोळ्या तसेच मोठ्या प्रमाणात कफ सिरपचा साठा देखील पोलिसांनी जप्त केला आहे.

दरम्यान, राजस्थान, प्रतापगड परिसरातून देशभरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पाठवले जातात. मुंबईत देखील तब्बल ७ किलो हेरॉइन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे मुंबई पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.

मुंबई पोलिस आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने चालू वर्षात पहिल्या आठ महिन्यांत ३५७५ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल ८७ कोटींचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत. अमली पदार्थ तस्करीची साखळी तोडण्यासाठी ड्रग्ज पुरवठादारांपासून ते व्यसन करण्यापर्यंतच्या आरोपींना पकडण्यावर पोलिसांनी भर दिला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा