अर्णब गोस्वामी पोलिस चौकशीसाठी हजर


अर्णब गोस्वामी पोलिस चौकशीसाठी हजर
SHARES

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात त्याने आक्षेपार्ह टिका केल्याप्रकरणी ना.म.जोशी मार्ग पोलिस ठाण्यात अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात या पूर्वीच अर्णबची १२ तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर अर्णबला पोलिसांनी रविवारी दुसऱ्यांचा चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते.  त्यानुसार बुधवारी अर्णब  पायधुनी पोलिस ठाण्याच चौकशीसाठी हजर राहिला होता.

हेही वाचाः- गोलंदाजांना चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा थुंकीचा वापर करण्यास मानाई


मुंबईच्या वांद्रे स्थानकाजवळ 29 एप्रिल रोजी वाढवण्यात आलेल्या लाँकडाऊनला विरोध दर्शवत गर्दी केली होती. या परिस्थितीवर विश्लेशन करताना अर्णब गोस्वामी यांनी या प्रकरणात जमावाने धार्मिक स्थळाजवळच गर्दी का? केल्याचा दावा केला होता. तसेच विशेष समुदायाचे नागरिकच का गर्दी करतात, अशा दावा केला होता. त्यामुळे या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप रझा अकादमीचे सचिव इरफान शेख यांनी करत पायधुनी पोलिसात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीवरून अर्णब विरोधात हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 153, 153(अ), 295(अ), 500, 505(2),511, 120(ब) 505(1)(ब)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोस्वामी यांच्यासह रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीच्या मालकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचाः- मान्सून जवळ आला तरी अद्याप पावसाळापूर्वी काम शिल्लक


काही दिवसांपूर्वीच अर्णब यांच्यावर ते घरी जात असताना अनोळखी व्यक्तींनी हल्ला केला होता. रिपब्लिकच्या स्टुडिओवरून ते घरी जात असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. अर्णब आणि त्याची पत्नी टोयोटा कारमधून घराच्या दिशेनं जात होते. त्यावेळी मुखवटा लावलेल्या गुंडांनी अर्णबच्या गाडीला ओव्हरटेक केलं. त्यानंतर त्यांच्या गाडीवर शाईनं भरलेल्या बाटल्या फेकत शिवीगाळ केली. वेळीच अर्णबच्या सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोरांना पकडलं आहे. त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यावेळी खासगी वाहिनीवर बोलताना अर्णबने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावेळी काँग्रेसच्यावतीने पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी पायधुनी पोलिसांनी रविवारी अर्णबला चौकशीसाठी समन्स पाठवल्यानंतर अर्णब त्याच्या वकिलासह बुधवारी पायधुनी पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाला होता.



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा