Advertisement

मान्सून जवळ आला तरी अद्याप पावसाळापूर्वी काम शिल्लक


मान्सून जवळ आला तरी अद्याप पावसाळापूर्वी काम शिल्लक
SHARES

येत्या काही दिवसात मान्सून महाराष्ट्रासह मुंबईत दाखल होणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. असं असतानाही मुंबई आणि उपनगरातील पावसाळापूर्व काम अद्याप शिल्लक आहेत. तसंच, मिठी नदीसह छोटे आणि मोठे नाले साफ झालेले नाही आहेत. त्यामुळं मुंबईत मान्सून दाखल झाल्यानंतर दरवर्षीप्रमाणे यंदाही मिठीसह छोटे आणि मोठे नाले तुंबण्याची दाट शक्यता आहे.

पावसाळ्यापूर्वी ७० टक्के गाळ, पावसाळ्या दरम्यान व त्यानंतर उर्वरित ३० टक्के गाळाचा उपसा केला जाणार असल्याचा दावा महापालिकेनं केला आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाल्यांची सफाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मिठी नदीतील साफसफाईसह मोठ्या व छोट्या नाल्यांची पावसाळापूर्व नालेसफाई वेगात सुरू झाली आहे.

दरवर्षीप्रमाणं एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नालेसफाईची बहुतांश कामं सुरू झाली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यंदाच्या नालेसफाईचे वेगळेपण म्हणता येईल, ते म्हणजे कोरोना कोविड १९च्या पार्र्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व काळजी घेऊन ही कामे करण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने यांत्रिक पद्धतीने नालेसफाई करण्यास प्राधान्य दिले जात असून त्यात मानवी हस्तक्षेप कमीत कमी असेल याकडे काटेकोरपणे लक्ष दिले जात आहे, असे महापालिका म्हणत आहे.

सोशल डिस्टन्सिंग काटेकोर पाळण्यात आला असून मास्क नियमितपणे वापरण्यात येत आहेत. मिठी नदीसह मोठ्या नाल्यांची साफसफाईची कामं ही प्रामुख्यानं महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खात्यामार्फत केली जात आहेत. छोटया नाल्यांच्या साफसफाईच्या कामांचं नियोजन व व्यवस्थापन पालिकेच्या विभाग कार्यालयांच्या स्तरावर करण्यात येत आहे.



हेही वाचा -

गोलंदाजांना चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा थुंकीचा वापर करण्यास मानाई

पालघर जिल्ह्यात ४० वर्षीय पोलीसाचा कोरोनामुळं मृत्यू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा