Advertisement

गोलंदाजांना चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा थुंकीचा वापर करण्यास मानाई

कोरोना व्हायरसच्या वाढता प्रादुर्भावाचा फटका आता बीसीसीआयसह क्रिकेट बोर्डांनाही बसला आहे.

गोलंदाजांना चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा थुंकीचा वापर करण्यास मानाई
SHARES

जीवघेण्या कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातला आहे. या कोरोना व्हायरसच्या वाढता प्रादुर्भावाचा फटका आता बीसीसीआयसह क्रिकेट बोर्डांनाही बसला आहे. गोलंदाज चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा थुंकीचा वापर करतात. परंतु, आता गोलंदाजांना चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा थुंकीचा वापर करण्यास मानाई करण्यात आली आहे. यासंदर्भात अनेक आजी-माजी खेळाडूंनी यावर नकारात्मक प्रतिक्रीया नोंदवल्या. यानंतर आयसीसीने आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.

बदली खेळाडू आणि लाळ किंवा थुंकीचा वापर करण्यासाठी मनाई हे नियम तात्पुरते असल्याचं आसीसीनं स्पष्ट केलं आहे. कसोटी सामन्यात एखाद्या खेळाडूला कोरोनाची लक्षणं आढळत असतील तर त्याच्या जागेवर संघाला बदली खेळाडू खेळवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र यासाठी सामनाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांची संमती घेणं गरजेचं असल्याचं आयसीसीनं आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे. टी-२० आणि वन-डे क्रिकेटमध्ये बदली खेळाडूचा नियम लागू होणार नाही हे देखील आयसीसीनं स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा - भारत- ऑस्ट्रेलियामध्ये ३ डिसेंबरपासून पहिली कसोटी

गोलंदाजांना सामन्यादरम्यान चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा थुंकीचा वापर केल्यास पंच त्याला समज देऊ शकतात. एका संघाला पंच किमान २ वेळा समज देऊ शकतात. मात्र, एखाद्या खेळाडूकडून वारंवार हा प्रकार घडल्यास गोलंदाजी करणाऱ्या संघाला दंड म्हणून प्रतिस्पर्धी संघाला ५ धावा बहाल करण्यात येणार आहेत. तसंच थुंकीचा वापर झाल्यास चेंडू स्वच्छ करवून घेण्याची जबाबदारीही पंचावर राहणार आहे. हे सर्व नियम तात्पुरते असल्याचंही आयसीसीनं स्पष्ट केलं आहे.

बीसीसीआयनं आयपीएलचा १३वा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. गेल्या २ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत. त्यामुळं होणारं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आयसीसीने खेळाडूंना सराव करण्यासाठी नियमावली आखून दिली. 

आयसीसीनं भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा डिसेंबर महिन्यात नियोजित करण्यात आला असून ३ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डासाठी खूप महत्त्वाचे आहे.


हेही वाचा -

राज्यात ४८ तासांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता

सरकारनं मदत न केल्यास शालेय बस संघटनेचा आंदोलनाचा इशारासंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा