Advertisement

राज्यात ४८ तासांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता

बुधवारपासून राज्यात मॉन्सून सक्रिय होण्यास सुरुवात होणार आहे.

राज्यात ४८ तासांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता
SHARES

जून महिन्याच्या पहल्याच दिवशी पावसानं हजेरी लावल्यानं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळं मुंबई विजेच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली परंतु, या वादळाच्या दुसऱ्या दिवशीपासून पावसानं चांगलीच विश्रांती घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र आता हवमान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्याचे संकेत मिळत असून, मॉन्सूनच्या पुढील वाटचालीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसंच, येत्या ४८ तासांत गोव्यासह महाराष्ट्रातील काही भागात मॉन्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. तळ कोकणात ११ ते १३ जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

बुधवारपासून राज्यात मॉन्सून सक्रिय होण्यास सुरुवात होणार आहे. १० अथवा ११जून रोजी मॉन्सूनचे गोवा, तळकोकणात आगमन होणार आहे. त्यानंतर १४ अथवा १५ जूनपर्यंत मॉन्सून वेगानं वाटचाल करीत संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता आहे.

कोकणात १२, १३ व १४ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता असून तसा इशारा देण्यात आला आहे. राज्यात १२ जूनपासून मॉन्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मॉन्सूनचं आगमन झाल्यानंतर वेगानं वाटचाल करणार असून, १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे.

हवमान विभागाचा इशारा

  • १० जून रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 
  • ११ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
  • १२ जून रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 
  • १३ जून रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.



हेही वाचा -

लोकल सेवेसाठी राज्य सरकारची केंद्राकडं मागणी

खाकी वर्दीतली माणुसकी, स्नेहसंमेलना ऐवजी केली अनोखी मदत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा