Advertisement

पालघर जिल्ह्यात ४० वर्षीय पोलीसाचा कोरोनामुळं मृत्यू


पालघर जिल्ह्यात ४० वर्षीय पोलीसाचा कोरोनामुळं मृत्यू
SHARES

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य पोलीस कर्मचारी जीव धोक्यात घालून कार्य बजावत आहेत. परंतू, कोरोनानं या पोलिसांनाच घेरलं आहे. आतापर्यंत राज्यातील १ हजारहून अधिक पोलीसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये मृत्यूची संख्याही वाढत आहे. आतापर्यंत ३४ जणांचा बळी घेतला असून, धक्कादायक बाब म्हणजे कोरोनामुळं एका ४० वर्षीय पोलीसाला आपला जीव गमवावा लागला आहे. हे वसई येथील वालीव पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

वालीव पोलीस स्टोशन हे पालघर जिल्ह्यात येत असून या पोलीसाच्या मृत्यूमुळं पालघर जिल्ह्यात पहिल्या मत्यूची नोंद झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यानं त्यांना सुरूवातील पालिकेच्या भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर १ जून रोजी त्यांना नालासोपारा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, २००३ साली पोलीस दलात दाखल झाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर जिल्ह्यातील पोलिसांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. कोरोनाचा प्रादुर्भाव हा पालघर जिल्ह्यातही अधिक असून, ३३ पोलीस आणि २ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

राज्यातील १ हजार ४३१ पोलिस हे सध्या कोरोनाने त्रस्त आहेत. विशेष म्हणजे मागील ४८ तासात ६६ पोलिसांनी कोरोनावर मात केल्याचं पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ठ होते. तर दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या महामारीने आतापर्यंत ३४ जणांचा बळी घेतला आहे.हेही वाचा -

बेस्टच्या ५४ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू

गोलंदाजांना चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा थुंकीचा वापर करण्यास मानाईRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा