पोलीस खबऱ्याला दीड कोटींच्या हेरॉइनसह अटक

पोलीस खबरी असल्याचं सांगत मुंबई, ठाण्यात तो अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्यांकडून खंडणी उकळत असल्याचंही समोर आलं आहे.

SHARE

अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या खबऱ्याला दीड कोटी रुपयांच्या हेरॉइन ड्रग्जसह अटक करण्यात आली आहे. खालिद वसी खान (५१) असं या खबऱ्याचं नाव आहे. मंगळवारी रात्री पोलिसांचं पथक डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानक, माझगाव परिसरात गस्त घालत होते. यावेळी खालिद वसी खान संशयास्पदरित्या फिरताना आढळला.

पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ४७० ग्रॅम हेरॉइन सापडलं. या ड्रग्जची किंमत १ कोटी ४१ लाख रुपये आहे. त्याची चौकशी केली असता त्याने आपण पोलिसांचे खबरी असल्याचं सांगितलं. गुन्हे शाखेने त्याला प्रशस्तीपत्रही दिल्याचं सांगितलं.  त्या पत्राची खातरजमा अंमली पदार्थ विरोधी पथक करणार आहे. 

 खालिद वसी खान मुंब्रा येथे राहणारा आहे. पोलीस खबरी असल्याचं सांगत मुंबई, ठाण्यात तो अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्यांकडून खंडणी उकळत असल्याचंही समोर आलं आहे. तो स्वत:ही अंमली पदार्थांची तस्करी तसंच विक्री करतो, अशी कबुलीही त्याने दिली आहे. याआधी त्याला गांजासह अटक झाली होती. त्याच्या पत्नीविरोधातही अंमली पदार्थ तस्करी, विक्रीचा गुन्हा असल्याची माहिती समोर आली आहे.हेही वाचा  -

अॅण्टॉप हिलमध्ये दोन बहिणींवर अत्याचार

बनावट तिकीट तपासनीसाला दादर स्थानकात अटक
संबंधित विषय
ताज्या बातम्या