कोरोनाच्या भितीने आठवड्याभरात 2520 कैद्यांची सुटका


कोरोनाच्या भितीने आठवड्याभरात 2520 कैद्यांची सुटका
SHARES

कोरोनाचा फटका कारागृहातील कैद्यांना बसू नये यासाठी राज्यातील मध्यवर्ती व जिल्हा कारागृहातील   2520 कच्च्या कैद्यांची सुटका मागील 7 दिवसात करण्यात आली आहे. आणखी कच्च्या कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे. त्यांच्या जामिनाची कार्यवाही सुरू असून, त्यांचीही आणखी दोन टप्प्यांमध्ये सुटका करण्यात येणार आहे.

 राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाची बाधा तुरूंगातील कैद्यांना होऊ नये म्हणून राज्यातील विविध मध्यवर्ती व जिल्हा कारागृहात कैदेत असलेल्या कच्च्या कैद्यांच्या (अंडर ट्रायल) सुटकेची प्रक्रिया तुरुंग प्रशासनाने सुरू केली आहे. त्यानुसार आठवड्या भरात एकूण 2520 कैद्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.  कच्चा कैद्यांप्रमाणेच 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा ठोठावलेल्या, तसेच सात वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झालेल्या मात्र दोन वेळा पॅरोलवर जाऊन नियमानुसार वेळेत परतलेल्या कैद्यांचीदेखील पॅरोलवर सुटका करण्यात येणार आहे. 1 एप्रिल रोजी सर्वाधिक म्हणजेच 485 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे.

राज्यभरातील विविध मध्यवर्ती व जिल्हा कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. या कारागृहातील कैद्यांची वाढती संख्या लक्षात घेता, येथील कैद्यांमध्ये कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरुंग प्रशासनाने राज्यभरातील विविध कारागृहांत कैदेत असलेल्या कच्च्या कैद्यांना तात्पूरता जामीन देऊन त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २७ मार्चपासून कच्च्या कैद्यांच्या सुटकेच्या कार्यवाहीला सुरुवात केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार तब्बल 11 हजार कैद्यांची सुटका केली जाणार असल्याची माहिती या पूर्वीच गृहमंञी अनिल देशमुख यांनी पञकारांना दिली होती.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा