क्रुझ ड्रग्स प्रकरण : शाहरुख खानचा मुलगा आर्यनला क्लिनचीट


क्रुझ ड्रग्स प्रकरण : शाहरुख खानचा मुलगा आर्यनला क्लिनचीट
SHARES

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रुझ ड्रग्स प्रकरणात दिलासा मिळाला आहे. ड्रग्स प्रकरणी आर्यन खानला क्लिनचिट मिळाली आहे. आर्यन खानसोबत इतर ५ जणांनाही  क्लिनचिट देण्यात आली आहे.

एनसीबीच्या आरोपपत्रात आर्यन खानचे नाव नाही. क्रूझ ड्रग्स प्रकरणात एनसीबीने नवीन आरोपपत्र दाखल केले, ज्यामध्ये आर्यन खानचे नाव नाही. आर्यन खानविरोधात पुरावे नसल्यानं त्याला क्लिनचीट देण्यात आली आहे.


क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मुंबई कोर्टाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ला आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुदतवाढ दिली होती. त्यानुसार आज एनबीसीने कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. यापूर्वी एनसीबीला 2 एप्रिल रोजी आरोपपत्र दाखल करायचे होते. मात्र तपास पूर्ण न झाल्याचे कारण देत एनसीबीने कोर्टाकडे मुदतवाढ मागितली होती. 

कोर्टाने ती 60 दिवसांपर्यंत वाढवून दिली होती. आज (27 मे) रोजी ती मुदतवाढ संपली असून एनसीबीकडून कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

अटक मेमोनुसार, एनसीबीने क्रूझवर आर्यनकडून 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन), 21 ग्रॅम चरस आणि एमडीएमए (एक्स्टेसी) च्या 22 गोळ्या आणि 1.33 लाख रुपये रोख जप्त केले आहेत. एनसीबीने आर्यन व्यतिरिक्त मुनमुन धमेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जस्वाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा आणि अरबाज मर्चंट यांना ताब्यात घेतले होते.

या वर्षीच्या मार्चच्या सुरुवातीला, सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानविरुद्ध एसआयटीला कोणताही ठोस पुरावा सापडला नाही किंवा आर्यनचा ड्रग्जशी आंतरराष्ट्रीय संबंध असल्याचा कोणताही पुरावा नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. आर्यनकडून ड्रग्ज जप्त करण्यात आले नसल्याचेही तपासात समोर आले आहे.

2 ऑक्टोबरच्या रात्री आर्यन खानला एनसीबीच्या टीमने मुंबईतील क्रूझ शिपच्या टर्मिनलमधून पकडले होते. आर्यन खानसोबत त्याचा मित्र अरबाज मर्चंटलाही एनसीबीने पकडले. ड्रग्ज प्रकरणात एकूण 8 जणांना अटक करण्यात आली. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावर ड्रग पार्टी होणार असल्याचा आरोप एनसीबीने केला होता. आर्यन खान या पार्टीचा भाग होणार होता.

अरबाजच्या शूजमधून ड्रग्ज पकडण्यात आले, तरीही एनसीबीला आर्यनजवळ ड्रग्स सापडले नाहीत. आर्यन काही दिवस एनसीबीच्या कोठडीत होता, त्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. आर्यनचा जामीन अर्ज दोनदा फेटाळण्यात आला. त्याला मुंबईतील आर्थर रोल जेलमध्ये ठेवण्यात आले आणि त्यानंतर 28 ऑक्टोबर रोजी आर्यनला जामीन मिळाला. मुंबईतील आर्थर रोल जेलमध्ये जवळपास २८ दिवस घालवल्यानंतर आर्यन खानची सुटका करण्यात आली होती.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा