शहीद अशोक कामटे यांना नोटीस, पोलिस महासंचालक कार्यालयाकडून 'गलतीसे मिस्टेक'

केंद्रानं पाठवलेल्या १४ जणांच्या यादीमध्ये शहीद अशोक कामटे, दिवंगत आर.के.सहाय, हिमांशू रॉय यांची नावं आहेत

SHARE

राज्याच्या गृह विभागानं १४ पोलीस अधिकाऱ्यांना आपली मालमत्ता जाहीर करण्याच्या सूचना केल्या होत्या. या अधिकाऱ्यांमध्ये शहीद पोलीस अधिकारी अशोक कामटे आणि आत्महत्या केलेले पोलीस अधिकारी हिमांशु राय यांच्या नावाचा देखील समावेश होता. अखेर मालमत्तेबाबत माहिती मागवण्याबाबत चूक झाल्याची कबुली राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी दिली


शहीद, अन्य मृत अधिकाऱ्यांचा समावेश

गृह विभागानं गेल्या ऑक्टोबर महिन्यात एकूण १४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावाची यादी राज्य सरकारकडे पाठवली होती. यादीत समाविष्ट असलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी आपले वार्षिक उत्पन्न जाहीर केलेलं नाही, असं विभागाने राज्य सरकारला कळवलं होतं. हे वार्षिक उत्पन्न कळवावं अशा सुचना केंद्रीय विभागाकडून करण्यात आल्या होत्या. त्या यादीमध्ये २६/११तील शहीद आणि अन्य मृत अधिकाऱ्यांचा समावेश होता


गलतीसे मिस्टेक

पण हा प्रकार समोर आल्यानंतर महासंचालक कार्यालयानं संबंधित यादीच संकेतस्थळावरून तातडीनं हटवण्यात आली आहे. सुबोध जायसवाल यांनी स्पष्ट केलं की, शहीद अशोक कामटे आणि दिवंगत अधिकाऱ्यांबद्दल आपल्या सर्वांना नितांत आदर आहे. शहीद आणि मृत अधिकाऱ्यांची नावं नजरचुकिनं राहिली होती. त्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांना दुखावण्याचा कुठलाच हेतू नव्हताही यादी तातडीनं हटवण्यात आली आहेसुधारित माहिती केंद्राकडे पाठवली जाईल.

कुठल्या अधिकाऱ्यांची नावं

केंद्रानं पाठवलेल्या १४ जणांच्या यादीमध्ये शहीद अशोक कामटे, दिवंगत आर.के.सहाय, हिमांशू रॉय, आनंद मंड्या, स्वेच्छानिवृत्ती घेतलेले व्ही. एस. लक्ष्मीनारायण, बडतर्फ मारिया फर्नांडिस, निवृत्त अप्पर महासंचालक भगवंत मोरे यांचा समावेश आहेहेही वाचा

बॉलिवूड अभिनेत्रीशी छेडछाड पडली महागात, आरोपीला ३ वर्षांचा तुरुंगवास

मुंबईत महिलांवरील अत्याचारात वाढ

संबंधित विषय
ताज्या बातम्या