पोलीस अधिकारी सचिन वाझे निलंबित

वाझेंच्या अटकेनंतर एनआयएच्या हाती भक्कम पुरावे लागल्याची चर्चा असतानाच वाझेंचं पुन्हा एकदा पोलीस सेवेतून निलंबन करण्यात आलं आहे. या पूर्वी १६ वर्षांपूर्वी ख्वाजा युनुस मृत्यू प्रकरणात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती.

पोलीस अधिकारी सचिन वाझे निलंबित
SHARES

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर कारममध्ये ठेवलेल्या स्फोटकांचं प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यप्रकरणी एनआयएच्या अटकेत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आलं आहे. विशेष शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी यासंबंधी आदेश जारी केले आहेत.

शनिवारी सचिन वाझे यांना एनआयएने १३ तास चौकशी केल्यानंतर अटक केली होती. वाझेंच्या अटकेनंतर एनआयएच्या हाती भक्कम पुरावे लागल्याची चर्चा असतानाच वाझेंचं पुन्हा एकदा पोलीस सेवेतून निलंबन करण्यात आलं आहे. या पूर्वी १६ वर्षांपूर्वी ख्वाजा युनुस मृत्यू प्रकरणात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती.

सचिन वाझे हे सध्या एनआयएच्या कोठडीत आहेत. एनआयए विशेष न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एनआयएची टीम आता या प्रकरणाचे क्राइम सीन रीक्रिएट करणार आहे. वाझेंना अंबानींच्या घराजवळ नेऊन त्यांना पीपीई कीट घातला जाणार आहे. यामध्ये ५ स्वतंत्र साक्षीदारांची मदत घेतली जात आहे. स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओजवळ २५ फेब्रुवारी रोजी पीपीई कीट घातलेली एक दिसून आली होती. हीच व्यक्ती स्कॉर्पिओचा पाठलाग करणाऱ्या इनोव्हा कारची चालक होती असंही सांगितलं गेलं. तोच सीन आता एनआयए रीक्रिएट करत आहे.

सचिन वाझे यांना १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ६ जून २०२० रोजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आदेशानुसार पुन्हा सेवेत दाखल करुन घेण्यात आलं होतं. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा